भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मानवंदना
पुणे – भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी मानवंदना दिली. 1 जानेवारी 1818 रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती यामध्ये 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशवांचा पराभव केला होता. या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ या विजय स्तंभाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते. दरवर्षी देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.
भीमा कोरेगाव च्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश आंबेडकर यांची मानवंदना
आज सकाळी 7 वा. ऍड. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, अशोक सोनोने, वंचितचे प्रवक्ते, अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक आणि प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, स्वातीताई कदम, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.
“1 जानेवारी हा देशाला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे.पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जायची,तीच्या विरोधातील हा लढा होता. आणि तो लढा यशस्वी झाला असं दिसतं.या लढ्यापासून सुरू झालेली सामाजिक चळवळ अजून सुरू आहे.जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या कार्यक्रमाचं महत्व राहील.” असं माध्यमांशी बोलताना एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा.. भीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या
हेही वाचा.. आत्मसन्मानाची लढाई कोरेगाव भीमा
हेही वाचा..ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? नक्की काय मिळणार आहे त्यावर खोटं बोलून?
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)