दिनांक 01 जानेवारी 1818 रोजी कोरेगांव भीमा येथे झालेल्या युद्धात कामी आलेल्या तसेच जखमी झालेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे, ता. हवेली. जि. पुणे येथे भीमा नदीच्या तिराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे.या जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी देश विदेशातून मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात.
या वर्षी झालेले विविध कार्यक्रम जसे की 14 एप्रिल,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी कार्तिकी वारी,गणेशोत्सव,नवरात्रोत्सव,ईद,6 डिसेंबर,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हे साजरे करण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी नियम सूचना निर्गमित केल्या आहेत.त्याच धर्तीवर 1 जानेवारी 2021 रोजी कोरेगांव भीमा जयस्तंभ पेरणे फाटा येथील अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचा संक्षिप्त आढावा
1 कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जयस्तंभ येथील कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरूपात पार पाडण्यात येईल.
2 जयस्तंभ परिसरात गर्दीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
3 जयस्तंभ येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येणार असून अनुयायांनी घरातूनच अभिवादन करावं असे आवाहन करण्यात आले आहे.
4 जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच आसपासच्या परिसरात सभा घेणे,खाद्यपदार्थ तसेच पुस्तकांचे स्टॉल लावणे यावर निर्बंध असेल.
संपूर्ण परिपत्रक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
Govt Circuler 22.12.2020 Bhima Koregaon
हेही वाचा.. भीमा कोरेगांव चा इतिहास मोठ्या स्क्रीनवर
हेही वाचा.. भीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)