बागेश्वर धाम च्या Bageshwar Dham धीरेंद्र शास्त्री Dhirendra Shastri बाबाला जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती हा दूसरा तिसरा कुणी नसून त्याच्याच भक्त असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कारवाई करत बागेश्वर धाम च्या धीरेंद्र शास्त्री ला धमकी देणाऱ्या भक्ताला ताब्यात घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची आता कसून चौकशी सुरू आहे.
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री ला त्याच्याच भक्ताने धमकी का दिली?
हा भक्त वैयक्तिक अडचणीत होता,आणि त्याला बाबाला भेटायचं होतं,मात्र त्याला भेटू दिलं जात नव्हतं यामुळे तो नाराज होता.त्यातून त्याने हे धमकी नाट्य घडवून आणलं असं आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.आरोपी भक्तावर आता 506 आणि 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धीरेंद्र शास्त्रीच्या चुलत भावानं छतरपूरच्या बमिठा पोलीस ठाण्यात या धमकी संदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. 22 जानेवारी रोजी रात्री 9.15 च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने कॉल केला. धीरेंद्र शास्त्रीशी बोलणे करून देण्यास सांगितलं.मात्र तो बोलू शकत नाही, असं सांगताच कॉल करणाऱ्या व्यक्तीने धमकावलं, असं पोलिस म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र शास्त्री चर्चेत आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी या बाबाला आव्हान दिलेलं होतं.त्यानंतर देशभरातील मिडियाने बाबाची हवा केली,सतत बातमी चालवली. यादरम्यानच त्यांना धमकी आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली.
download bbc डाउनलोड बीबीसी डॉक्युमेंटरी का सर्च करत आहेत लोक?
जगदीश गायकवाड ला मुंबईत मारहाण
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 25,2023 17:44 PM
WebTitle – ‘Bhakt’ threatening Bageshwar Dham Dhirendra Shastri