मुंबई: मुलुंड येथील भैय्यासाहेब आंबेडकर चौकाची निर्मीती १९८९ साली तत्कालीन समाज कल्याण मंत्री मा. रामदास आठवले साहेब ह्यांच्या हस्ते उद्घाटन करुन झाली. मागील ३२ वर्षांपासुन ह्या चौकाची देखभाल, नुतनीकरण, डागडुजी आंबेडकरी समाज स्वखर्चाने करत आला आहे. आता अचानक स्थानिक नगरसेवक Manoj K Kotak यांच्या नगरसेवक निधीतून ह्या चौकाचे नुतनीकरण करण्याचा ५०-७० हजार रुपयांचा प्रस्ताव टी विभागातून पारीत करण्यात आला आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आंबेडकरी जनतेला खुश करण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न
ज्यांनी आजतागायत चौकाच्या देखभालीसाठी रुपयाही खर्च केला नाही त्या लोकांनी नगरसेवक महोदयांकडे नुतनीकरणाची मागणी केल्याचे ऐकण्यास मिळाले. सदर चौकावर महानगरपालिकेच्या वतीने मागील ३२ वर्षात १रुपयाही खर्च करण्यात आला नाही परंतु बृहंमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आंबेडकरी जनतेला खुश करण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न सुरु आहे.
इकडे मुलुंडच्या प्रसुतीगृहात गरोदर मातांचा व नवजात बालकांचा डॅाक्टरांआभावी मृत्यू होत आहे नगरसेवक महोदयांनी व टी विभागाच्या अधिकारयांनी त्यासाठी फंडाची तरतूद करणे महत्वाचे आहे. भैय्यासाहेब आंबेडकर चौकाचे नुतनीकरण, सुशोभीकरण करण्यास आंबेडकरी समाज सक्षम आहे. त्याअनुषंगाने संविधानदिनानिमित्त आंबेडकरी समाजाच्या वतीने भुमीपुजन सोहळा पार पाडण्यात आला.
बृहंमुंबई महानगरपालिकेच्या टी विभागाने व्यापक लोकहितांच्या बाबींवर नगरसेवक निधी खर्च करुन
लोकउपयोगी सुविधा पुरविण्यासाठी भर द्यावा. भैय्यासाहेब आंबेडकर चौकाशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत.
हा विषय आमच्या आस्थेचा आहे.आमच्या अगोदरच्या पिढीने मेहनतीने बांधलेला हा चौक आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे.
पॅंथरच्या काळातील लढवय्यांची एक आठवण
पॅंथरच्या काळातील लढवय्यांची ती एक आठवण आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी लागणारा संपुर्ण खर्च करण्यास तयार आहोत याची MyBmc ने ही नोंद घ्यावी व टी विभागाचा प्रस्ताव रद्द करावा. टी विभागाने जोर जबरदस्तीने नुतनीकरणाच्या नावाखाली चौक निष्कासित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यानंतर निर्माण होणारया कायदा व सुव्यवस्थेच्या परीस्थितीस आपणच जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन (६डिसेंबर) जवळ येत असताना
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी
व समाजामध्ये तेढ निर्माण होऊन वातावरण गढूळ होऊ नये याची खबरदारी घ्यावी
ही नगरसेवक/खासदार व टी विभाग अधिकारयांना आमची नम्र विनंती.
Good News : आंतरजातीय लग्न केले तर , हे राज्य देणार 5 लाख
धर्म बदलला तरी जात बदलत नाही; मद्रास हायकोर्टाचा निकाल
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 28, 2021 15:13 PM
WebTitle – Bhaiyasaheb Ambedkar Chowk will be renovated at the expense of the people of Ambedkar