प्रयागराजमध्ये महाकुंभाचे भव्य उद्घाटन झाले आहे. विविध आखाड्यांनी संगमाच्या काठावर आपली छावणी उभारली आहे. शानदार मिरवणुकीसह अखाड्यांनी प्रयागराजमध्ये प्रवेश केला. मात्र, या मिरवणुकीदरम्यान निरंजनी आखाड्याच्या पेशवाई दरम्यान एक साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.महाकुंभ मेळाव्यातील ही सुंदर साध्वी कोण? जाणून घ्या…
लोक या साध्वीला महाकुंभातील “सर्वात सुंदर साध्वी” म्हणून संबोधत आहेत. खरंतर एका महिला पत्रकाराने या साध्वीशी संवाद साधला आणि विचारले की , “तुम्ही इतक्या सुंदर आहात; तुम्हाला साध्वी जीवन सोडावेसे वाटत नाही का?” यावर साध्वीने विचार करून उत्तर दिलं आणि दोन वर्षांपूर्वी संन्यास घेतल्याचं तसेच त्यामागील कारण देखील स्पष्ट केले.
साध्वी हर्षाचा मिरवणुकीत भव्य प्रवेश
निरंजनी आखाड्याच्या संतांसोबत साध्वी हर्षाने प्रयागराजमध्ये भव्य मिरवणुकीत रथावरून प्रवेश केला.
तिच्या सौंदर्याने अनेक टीव्ही चॅनेल्सचे रिपोर्टर आणि यूट्यूबर्स प्रभावित झाले.
एकाने विचारले की, “तुम्ही इतक्या सुंदर असूनही साध्वी का बनलात?” या प्रश्नावर साध्वीच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली.
साध्वी होण्यामागील हर्षाचा प्रवास
हर्षाने सांगितले की, ती उत्तराखंडची आहे आणि आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांची शिष्या आहे. तिला विचारण्यात आले की, इतक्या सुंदर असूनही साध्वी का बनलात? यावर ती म्हणाली, “माझ्या मनाला शांती मिळवण्यासाठी मी जे काही होते ते सोडले आणि हा वेष धारण केला आहे.” तिने पुढे सांगितले की, शांती आणि समाधानाच्या शोधात ती दोन वर्षांपूर्वी साध्वी बनली.
सोशल मीडियावर हर्षाच्या पूर्वीच्या जीवनाची चर्चा
साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी तिच्या दोन वर्षांपूर्वी साध्वी होण्याच्या दाव्याला खोडून काढले.
अनेकांनी तिचे जुने व्हिडिओ आणि फोटो एक्सवर शेअर करत ती फक्त एक कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर असल्याचा दावा केला.
हर्षाचा आधीचा प्रवास
हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून इन्स्टाग्रामवर रिल्स बनवत असून तिच्या हँडलचे नावच host harsha असे आहे.
याशिवाय ती आध्यात्मिक आणि धार्मिक विषयांवरील कंटेंट देखील तयार करत आहे.
मात्र, ती मेकअप व्हिडिओ आणि शो होस्ट करतानाही दिसते.
एक्सवर एका युजरने तर थेट थायलंड च्या शो ला होस्ट केल्याचा दावा करत म्हटलं की, “हर्षा दोन महिन्यांपूर्वी इव्हेंट होस्ट करत होती, मग ती दोन वर्षांपूर्वी साध्वी कशी झाली?”
इस महिला को महाकुंभ में दिव्य साध्वी बताया जा रहा है आइए इसका पूरा सच बताता हूं….
— Lalit Yadav (@Lalityadav_0007) January 13, 2025
ये एक एंकर, ब्लॉगर, फिटनेस ट्रेनर है या रही है और इनको एक महात्मा जैसा सम्मान दिया जा रहा है
जबकि इन्होने खुद बताया कि मैं आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ उत्तराखंड से आई हूं
सबसे बड़ा सवाल… pic.twitter.com/iqopU2pc8g
वाद आणि प्रश्न
एका युजरने तिच्या इंस्टाग्राम हँडलला टॅग करत लिहिले की, “ही व्यक्ती सनातन धर्माचा अपमान करत आहे.” सोशल मीडियावर साध्वीच्या खऱ्या ओळखीबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे, आणि लोक तिच्या धार्मिक दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
एक युजरने लिहिलं , “पहा या साध्वीचे खरे आयुष्य! हळुहळु सगळ्यांचा भ्रम तुटेल !
इस साध्वी की असली जिंदगी देखिए ! धीरे धीरे सबके भरम टूटेंगे ! https://t.co/fJxzJWkKJy pic.twitter.com/vcYPlOj080
— Hansraj Meena (@HansrajMeena) January 13, 2025
महाकुंभातील या साध्वीची खरी ओळख लवकरच समोर येईल, परंतु तिच्या सौंदर्याने आणि वादग्रस्त दाव्यांमुळे ती आधीच चर्चेत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 13,2024 | 23:26 PM
WebTitle – beautiful-sadhvi-host harsha mahakumbh-viral-video