इतिहास हा इतिहास असतो आणि तो बदलता येत नाही असं म्हणतात,कारण त्या शब्दातच त्याचे वर्णन आहे. या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी आहे.1 जानेवारी 1818 मध्येही असाच एक इतिहास घडला.ज्याची दखल इतिहासाने घेतलीच परंतु सातासमुद्रापार विदेशातही घेतली जाते.तो म्हणजे भीमा कोरेगांव ची लढाई.या लढाईवर आधारित एक हिंदी चित्रपट लवकरच येत आहे.
A history of the Maratha people
ही लढाई पेशवे आणि तत्कालीन ब्रिटिश यांच्यात घडली, भीमा-कोरेगांव लढाईचा इतिहास इंग्रजांनी लिहिला म्हणून तरी ते आपल्याला माहित झालं नाहीतर अशा कितीतरी शौर्यगाथा आजही वाचा फुटण्याची वाट पहात असतील.किंकेड चार्लस अन पारसनीस यांनी संपादित केलेलं हे पुस्तक ब्रिटीश स्कूल ऑफ मिलिटरी मध्ये अभ्यासाला आहे. या लींकवर ते मोफत वाचता येईल. A history of the Maratha people या पुस्तकात खालील लिंकवर तुम्हाला नेमका संदर्भ सापडेल.पान क्रमांक २१४-२१६ वर भीमा-कोरेगांव लढाईचा संदर्भ वाचता येईल.ही लढाई आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
हा चित्रपट किंवा हा इतिहास पाहताना एक लक्षात घ्यावे लागेल की तेव्हा भारत हा एक स्वतंत्र देश नव्हता,
भारत हा एकसंध देश नव्हताच.इथं हजारो संस्थानिक होते आणि त्यांची वेगवेगळी राज्ये होती.
आणि हे संस्थानिक राजे एकमेकांच्या विरोधात लढाया करत होते.हाही एक इतिहास आहे.
त्यामुळे आजच्या पिढीला ही भीमा कोरेगांव ची लढाई अभ्यासताना हे वास्तव भान ठेवणं गरजेचं,तीच गोष्ट चित्रपट पाहताना लक्षात घेतली पाहिजे.
चित्रपट म्हणल्यावर त्यात काही रंजक दृश्ये ललकारणारे चेतवणारे संवाद आणि संगीत असणार
आणि काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी सुद्धा घेतलेली असू शकणार हे गृहीत धरूनच पुढील चित्रपट आपण पाहिला पाहिजे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अर्जुन रामपाल ,अभिनेत्री दिगांगगना सूर्यवंशी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केली असून, चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थेटे यांनी केले आहे.रमेश थेटे हे निवृत्त सनदी अधिकारी होते.या चित्रपटाला आर्थिक सहाय्य सुद्धा त्यांचेच असून निर्माता म्हणूनही त्यांनी बाजू सांभाळली आहे. यासोबतच समाजातील अनेक लोकांनी सुद्धा यासाठी आर्थिक मदत केल्याचे दिग्दर्शक रमेश थेटे यांनी सांगितलं.सध्या या चित्रपटाचे प्रोमोज समाज माध्यमावर पाहायला मिळत असून लोकाना ते आवडत असल्याचे दिसत आहे.चित्रपटास टीम जागल्या भारतच्या शुभेच्छा !
हेही वाचा.. भीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)