खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत
माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. अनिल देखमुखांच्या नागपुरातील घरावर ही छापेमारी करण्यात आली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा झपाटाच लावला आहे.खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. अशा आशयाचं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत.
आज ED ची कारवाई ज्यांच्यावर झाली ते @AnilDeshmukhNCP आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले @advanilparab ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत.
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) June 25, 2021
अनिल देशमुखांची रवानगी जेलमध्ये होणार – किरीट सोमय्या
अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते.काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार.असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते.
काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) June 25, 2021
तसेच, अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.
त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी याची माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा,जाणून घ्या कारण
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 25 , 2021 15: 30 PM
WebTitle – atul bhalkhalkar tweeted about sharad pawar and uddhav thackeray on ed raid on anil deshmukh 2021-06-25