पृथ्वी थिएटर येथे होणाऱ्या थिएटर ऍक्टिव्हिटीमध्ये मकरंद देशपांडे शिवाय आसिफ बसरा दिसले नाही अस कधी आठवत नाही.आज आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली हे धक्कादायक आहे.हिंदी,उर्दू आणि इंग्रजी रंगभूमीत समरसून काम करणार्या आणि रंगभूमीवर नितांत प्रेम असणाऱ्या वेड्या कलावंतांपैकी आसिफ बसरा हे एक नाव होतं. नुसतं थिएटरच नव्हे तर हिंदी सिनेमा, हॉलिवूड सिनेमा, कमर्शियल ऍड्स, आणि वेबसिरीज असा या कलाकाराचा आवाका होता.
पृथ्वी थिएटरच्या सर्वेसर्वा
आसिफ कुठल्याही रोल मध्ये दिसला की एक सुखद धक्का बसायचा.पृथ्वीवर थिएटर फेस्ट असला की आसिफशी हमखास भेट व्हायची . स्वतः हुन आसिफ स्माईल करीत जवळ यायचा आणि हॅलो करायचा. पृथ्वी थिएटर मधील अनेक कार्यशाळांना माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मी जायची . त्यात एका कार्यशाळेचा प्रशिक्षक आसिफ होता.पृथ्वी थिएटरच्या सर्वेसर्वा आणि शशी कपूरच्या कन्या संजना कपूर यांच्या विश्वासू माणसांपैकी आसिफ एक होता.कार्यशाळेत सर्व मुलांना आसिफ सर भयंकर आवडायचा.
माझी आणि आसिफची त्या दरम्यान ओळख झाली.
त्यानंतर अनेकदा पृथ्वी थिएटरला गेली असता आसिफ भेटला की हमखास विचारायचा how is Viraj?
आणि मला आश्चर्य वाटायचे की ह्या माणसाला अनेक वर्षां नंतरही माझ्या मुलाचे नाव आठवते.
What’s new going on ? असं विचारलं की आसिफ थिएटर मधील आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचा.
असिफला मी चांगल्या नाटकांबद्दल विचारायची.आणि आसिफ ये देखो,वो देखो,असा भराभर दोन चार नाटकं सजेस्ट करायचा.
रंगभूमीवर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व
चेहऱ्यावर सदा लोभस लाजाळू हलकं हास्य आणि कार्यमग्न मितभाषी असे असिफचे व्यक्तिमत्व होते.करोना काळात फिल्म शुटिंग, टीव्ही शोज, रंगभूमी बंद पडली आणि ह्या उद्योगात रोजंदारीने काम करणाऱ्या विशेषतः छोटे मोठे कलावंत, टेक्निशियन्स, इत्यादींच्या पोटावर अक्षरश: गदा आली. त्यामुळे अनेकांना डीप्रेशन आलीत.हरहुन्नरी कलावंत आसिफ बसरा यांची आत्महत्या हा आणखी एक धक्का ह्या जगताला बसलाय आणि ह्या आत्महत्ये मागे करोना काळातील financial burdan असावं असा सध्यातरी पोलिसांचा कयास आहे.
आसिफ बसरा हे रंगभूमीवर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व होते.
अनेक हिंदी आणि इंग्लिश नाटकात आसिफ यांनी भूमीका केल्यात.
हिंदी सिनेमा शिवाय आऊटसोर्स , तंदुरी लव्ह इत्यादी हॉलिवूड पटात देखील त्यांनी भूमिका केली.
अनेक कमर्शियल ऍड्स मध्येही आसिफ दिसायचा.पृथ्वी थिएटर मधील थिएटर ऍक्टिव्हिटीमध्ये आसिफ सदा ऍक्टिव्ह असत.
आसिफ़ने अलीकडेच गाजलेली वेबसीरीज़ पाताल लोक मध्येही उल्लेखनीय भूमिका केली होती.याशिवाय अनेक गाजलेल्या सिनेमात त्यांच्या भूमिका आहेत .1993 मुंबई बॉम्ब ब्लास्टवर आधारित फ़िल्म ब्लॅक फ़्रायडे , 2002 गुजरात दंग्यांवर आधारित काय पो छे, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, क्रिश, जब वी मेट इत्यादी.
रेस्ट इन पीस आसिफ….??
BY Jayashree Ingle
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)