आसाराम पूर्ण नाव: असूमल थौमल सिरुमलानी किंवा असूमल सिरूमलानी, जन्म 17 एप्रिल 1941, मूळचा पाकिस्तान मधिल नवाबशाह जिल्हा, सिंध प्रांत स्वातंत्र्य पूर्व भारत इथे जन्म झालेला आसाराम चं कुटुंब फाळणीनंतर गुजरातमधिल अहमदाबाद मध्ये स्थायिक झालं. भारतात आध्यात्मिक बुवा किंवा संत म्हणून त्याने आश्रम सुरू केले होते.त्याचे भक्त त्याला बापू या नावाने संबोधतात. भारतात आसाराम चा भक्त संप्रदाय प्रचंड आहे,जवळपास 450 हून अधिक लहान-मोठ्या आश्रमांचा यात समावेश आहे.२०१३ च्या बलात्कार अन लैंगिक शोषण केसमध्ये आसाराम बापू दोषी आढळून आला त्यामुळे कोर्टाने त्याला मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा सुनावली आहे.आसाराम चं आता वय ८१ वर्षे आहे.
चायवाला होता आसाराम बापू
आसारामच्या जन्माच्या काही काळानंतर, त्याचे कुटुंब 1947 मध्ये अहमदाबाद शहरात गेले आणि फाळणीच्या वेळी सिंधमधली त्यांची जंगम मालमत्ता सोडली. संपत्ती आणि सर्वस्व गमावल्याने कुटुंब आर्थिक संकटाच्या चक्रात अडकले. येथे आल्यानंतर थौमल यांनी उपजीविकेसाठी लाकूड आणि कोळशाचा व्यवसाय सुरू केला आणि आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. यानंतर त्याने साखरेचा व्यवसायही सुरू केला होता.पुढे आसाराम चहाचा व्यवसाय करू लागला.विजापूरमध्ये हे चहाचं दुकान आजही आहे असं समजतंय.आसाराम याच दुकानात बसून चहा बनवत विकत होता असे जुने आणि जेष्ठ स्थानिक लोक सांगतात.त्याने काहीकाळ सायकल रीपेरिंग पासून टांगा सुद्धा चालवण्याचे काम केल्याची माहिती मिडियारिपोर्ट मध्ये येत आहे.
लग्नाच्या आठ दिवस आधीच घरातून गुपचूप पळून गेला
किशोरवयात पोहोचताच त्याचं लग्न लावून देण्याचा विचार सुरू झाला अन घरच्यांनी लग्नाची तयारी केली होती,मात्र लग्नाच्या आठ दिवस आधीच तो घरातून गुपचूप पळून गेला होता.खूप शोध घेतल्यानंतर कुटुंबीयांना तो भरूचमधील एका आश्रमात सापडला.घरच्यांच्या खूप विनवणीनंतर तो लग्नासाठी तयार झाला.त्यानंतर त्याला मुलगा नारायणसाई आणि मुलगी भारती देवी ही दोन मुलं झाली.
1964 मध्ये तो पुन्हा घरातून पळून गेला. इकडे तिकडे फिरत तो केदारनाथला पोहोचला, तिथे आसाराम बापू ने अभिषेक केला.तेथून श्रीकृष्णाचे निवासस्थान असलेल्या वृंदावनात पोहोचला. होळीच्या दिवशी येथील दरिद्रनारायण येथे भंडारा करून तेथे काही दिवस मुक्काम करून नंतर उत्तराखंडला रवाना झाला.
यादरम्यान त्यांने गुहा, दऱ्या, पर्वत रांगा आणि अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यानंतर तो नैनितालच्या जंगलात पोहोचला. 40 दिवसां नंतर तो लीलाशाहजी महाराजांना भेटला. लीलाशाहजी महाराजांनी आसुमलला गुरुमंत्र दिला आणि घरी तप करण्याचा आदेश देऊन ७० दिवसांनी अहमदाबादला परत पाठवले.
साबरमती नदीच्या काठावर बांधली झोपडी
साबरमती नदीच्या काठावर 29 जानेवारी 1972 रोजी भक्तांनी आश्रम म्हणून एक झोपडी तयार केली होती. या जागेच्या आजूबाजूला काटेरी झुडपे आणि ओबडधोबड जंगल होते, जिथे दिवसाढवळ्या आल्यावरही चोर, दरोडेखोर यांची भीती कायम असायची.
आसारामने साबरमतीच्या काठावर आपल्या झोपडीवजा आश्रमापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ‘नारी उत्थान केंद्र’ या नावाने महिला आश्रम स्थापन केला. महिला आश्रमात भारतातील विविध राज्यातून तसेच परदेशातूनही महिला येत. यानंतर सत्संगासाठी योग वेदांत सेवा समितीच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. ज्यात लाखोंच्या संख्येने श्रोते आणि भाविक पोहोचू लागले.
भक्तांची संख्या वाढू लागली आसाराम बापू लोकप्रिय होऊ लागला,एकदा ऑगस्ट 2012 मध्ये, त्याचे हेलिकॉप्टर गोध्राजवळ क्रॅश झाले, ज्यामध्ये सुदैवाने आसाराम आणि पायलटसह सर्व प्रवासी सुखरूप बचावले.हाच तो टर्निंग पॉइंट ठरला अन त्यानंतर त्यांच्या सत्संगात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली.
मोदींना सुद्धा दिली होती धमकी
2009 मध्ये अहमदाबादच्या आश्रमात समर्थकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आसाराम चांगलेच संतापले आणि त्यांनी ‘जेव्हा लहान मुलांवर अन्याय होतो तेव्हा मी दुर्वासाचे रूप धारण करतो’ असं म्हटलं होतं. एवढच नाही तर त्यांनी त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना धमकीही दिली होती. ते मोदींना म्हणाले, ‘वाह मुख्यमंत्री, बघा तुमची खुर्ची किती दिवस अन कशी टिकते.’
सुरतच्या तरुणीने आरोप केला होता
सूरतस्थित महिलांनी ऑक्टोबर 2013 मध्ये आसाराम आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार
आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता.
लहान बहिणीने नारायण साई आणि मोठ्या बहिणीने आसारामविरोधात तक्रार दाखल केली होती.
खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला.
महिलाच त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद
न्यायमूर्ती निर्मलजीत कौर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आसाराम बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ‘पीडोफिलिया’ या आजाराने ग्रस्त असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. यासंदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर करण्यात आले. दुसरीकडे, आसारामचे वकील राम जेठमलानी यांनी पीडितेचे चारित्र्य आणि आचरणाविरोधात चार प्रतिज्ञापत्रे सादर केली.तसेच त्याला असणाऱ्या आजाराने उलट महिलाच त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद केला होता.
जोधपूर हायकोर्टात वकिलाने आसारामला हा आजार असल्याचा दावा न्यायाधीशांसमोर मांडला.
किंबहुना, हा दावा आसारामचे वकील राम जेठमलानी यांच्या
अल्पवयीन मुलीला पुरूषांकडे आकर्षित होण्याच्या आजाराने ग्रासल्याच्या दाव्यावर भारी ठरला.
हा युक्तिवाद पाहता न्यायाधीशांनी आसारामचा जामीन अर्ज फेटाळला होता.
वकिलाने न्यायमूर्तींना सांगितले की, पेडोफिलिया हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे,
ज्यामुळे जेव्हा जेव्हा पुरुष एखाद्या मुलीकडे पाहतो तेव्हा त्याच्या मनात चुकीचे विचार सुरू होतात.
आणि तो तिच्याशी संबंध ठेवण्याचा विचार करू लागतो.
आसारामला जामीन मिळाल्यास तो आणखी अनेक मुलींना आपल्या विकृतीचा बळी बनवू शकतो,
असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये.असं वकिलांनी कोर्टासमोर मांडलं होतं.
23 ऑगस्ट 2013 रोजी आसाराम वर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी
कमला मार्केट पोलिस स्टेशनमध्ये घुसून तोडफोड केली होती.
आसाराम बापूच्या विरोधात स्टेटमेंट देण्यासाठी एक साक्षीदार राहुल सचान न्यायालयात गेला असता
त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता,
तर 12 जुलै 2015 रोजी क्रिपालसिंग या दुसऱ्या साक्षीदारचा शहाजहानपूर येथे खून करण्यात आला होता.
गांधी यांचा खून पाकिस्तानला ५५ कोटी दिले म्हणून झाला होता का?
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 31,2023 19:00 PM
WebTitle – Asaram Bapu is finally punished; Chaiwala to Baba know the whole journey