जयभीम हा सिनेमा १९९० च्या दशकात घडलेल्या सत्य घटनेवरील असून ह्यात राजकन्नू आणि पार्वती या कुरवा जमातीतील पती पत्नीची हृदय द्रावक गोष्ट असून त्याच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या वकिलाची म्हणजेच चंद्रुची ही गोष्ट आहे.राजकन्नू या निरपराध व्यक्तीवर आरोप ठेवून त्याला पोलिस अटक करून उचलून नेतात,पुढे पोलिस कोठडीतून त्याला गायब केले जाते. खरंतर त्याच्यावर अमानुष अत्याचार केले जातात,अन यातच त्याचा मृत्यू होतो.यानंतर खुनाचा गुन्हा दडविण्यासाठी पोलिस आरोपी फरार आहे.असं सांगून हात झटकण्याचा प्रयत्न करतात.त्याला न्याय मिळवून देणारी जयभीम चित्रपटाची कथा,पुढे हेबीयस कॉर्पस एक्ट नुसार न्यायालय राजकन्नू या निरपराध व्यक्तीला हजर करण्याचे आदेश पोलिसांना देते अन इथेच पोलिसांचा गुन्हा उघड होतो,सध्या महाराष्ट्रात एक असेच प्रकरण गाजते आहे. तपशील थोडे वेगळे आहेत.अटक केलेला रॅपर राज मुंगासे गायब झाल्याची माहिती रॅपर चा भाऊ संतोष मुंगासे यांनी दिली आहे.
50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन
राज मुंगासे हा एक रॅपर असून त्याने बनवलेल्या “50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे बोल असणाऱ्या रॅप सॉन्ग ने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली.मात्र यामुळे शिंदे गटाची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाकडून रॅपर राज मुंगासे वर गुन्हा दाखल करण्यात आला,त्यानंतर त्याला तत्परता दाखवत अटक देखील करण्यात आली.संभाजी नगर पोलिसांनी राज मुंगासे यास अटक करून अंबरनाथ पोलिस स्टेशन च्या पोलिसांना हाती सोपवतील असे सूचक ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
खरंतर कोणत्याही आरोपीला कोणत्याही गुन्ह्याखाली अटक केल्यास त्यासंबंधीत माहिती संबंधित आरोपीच्या नातेवाईकांना देणे कायद्याने बंधनकारक आहे.असे असताना पोलिसांकडून ही माहिती राज मुंगासे यांच्या घरच्यांना देण्यात आलीच नाही,असा आरोप रॅपर राज मुंगासे यांचा भाऊ संतोष मुंगासे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ती माहिती/पोस्टच ट्विटरवर शेअर करून म्हटलंय की
राज मुंगासे हा रॅपर ज्या दिवसापासून त्याचे गाणे सोशल मीडियावर आले,
त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली. पण, तो कुठे आहे?
कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही.
घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या मनातील भिती स्पष्ट दिसत आहे.
पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. त्वरीत त्याचे शोधकार्य करावं आणि
छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या राज मुंगासेच्या कुटुंबियांना माहिती द्यावी. त्याचे कुटुंबीय दुःखात आहे.
दलाई लामा यांचा लहान मुलासोबतचा किस व्हिडिओ नेखळबळ
प्रेमी समजून भावा-बहिणीला झाडाला बांधून जबर मारहाण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 11,2023 12:24 PM
WebTitle – Arrested rapper raj mungase missing?