रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्नब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांकडून अटक करण्यात आली. यानंतर सोशल मिडियात भाजपचे संपूर्ण मंत्रिमंडळ यात गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की “कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले.रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे.ही घटना आणीबाणीची आठवण करून देणारी आहे.प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य जपले जावे आणि अशा गोष्टीचा प्रतिकार केला जाईल.
यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल खालील ट्विट केले आहे.
यातील मुद्दे पाहिले तर दोन्ही नेत्यानी यात शिवसेनेचे नाव कुठेही घेण्याचे टाळले आहे.महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे. शिवाय महाविकास आघाडीतील तो मोठा भाऊ आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आहेत.मात्र दोन्ही भाजप नेत्यांनी टार्गेट केले आहे कॉँग्रेस पक्षाला.आणि सोनिया गांधी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.
भाजपचे अनेक नेते हीच लाइन घेत आहेत.अनेकांनी घटनेचा निषेध केला असून टीका केली आहे. यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, एस. जयशंकर, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी यांचा समावेश आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले?
कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही.पोलिसानी कायद्याच्या नियमानुसारच कारवाई केली आहे.असं त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती.सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यामुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे का?
अर्नबच्या अटकेने खरंच प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात आले?
याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे.
रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांची झालेली अटक ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य यात येत नाही.यामुळे या घटनेला त्याच्याशी जोडता येत नाही.अन्वय नाईक यांच्या आत्महत्येस पैसे न दिल्याने जबाबदार धरणे हा दोन व्यक्ति मधिल पैशांच्या व्यवहाराचा मुद्दा आहे.रिपब्लिक स्टुडिओचे इंटेरियर डिझाईन अन्वय नाईक यांनी केले होते.यासाठीची ठरलेली रक्कम देण्यास रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांनी टाळाटाळ केली. रक्कम थकवली त्यामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली असा आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला आहे. खालील व्हिडओ मध्ये ते पाहता येईल,त्यांनी या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा म्हणून सर्वांना आवाहन केले आहे.
स्वातंत्र्याची गळचेपी झाली नाही
या मुद्यावर आपल्या लक्षात आले असेल की यामध्ये पत्रकारीतेचा कोणताही मुद्दा उपस्थित होत नाही.
हा व्यावसायिक व्यवहाराचा मुद्दा असून हे प्रकरण वैयक्तिक स्तरावरील आहे.
या प्रकरणात कोणत्याही सरकार विरोधात बोलले गेले नाही.या प्रकरणात कोणत्याही काल्पनिक टुकडे टुकडे गॅंगचा लवलेश नाही.त्यामुळे गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट हे राजकारणाचा भाग आहे असे म्हणता येते.या प्रकरणाचा पत्रकारीतेशी दुरान्वये संबंध नाही.त्यामुळे
रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणने योग्य नाही.
अर्नब यांच्या अटकेने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी झाली नाही.आणि प्रेसचे स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आलेले नाही.
टीम जागल्या भारत
सदैव सत्यासोबत
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)