डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती करिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 4 : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. त्यामुळे जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
त्यामुळे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करावा, त्यामुळे विहीत वेळेत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा
अ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
क. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
ड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र
ई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
फ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
ग. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
ह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे
खासदार जयसिद्धेश्वर स्वामी च्या अडचणीत वाढ, बनावट जातीचा दाखला
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)