अन्वय नाईक यांची सुसाईड नोट,यामध्ये रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख स्पष्ट दिसत आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो पोस्ट केला आहे. “अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी पोलिसांच्या नजरेतून सुटावी यासाठी फडणवीस सरकारने प्रयत्न केले. हे खूपच लज्जास्पद आहे,” अशी कॅप्शन सचिन सावंत यांनी हा फोटो शेअर करताना दिली आहे.
अर्नबच्या अटकेने खरंच प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात आले?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्नब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांकडून अटक करण्यात आली.
यानंतर सोशल मिडियात भाजपचे संपूर्ण मंत्रिमंडळ यात गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की “कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले.रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे.ही घटना आणीबाणीची आठवण करून देणारी आहे.प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य जपले जावे आणि अशा गोष्टीचा प्रतिकार केला जाईल.
काय आहे प्रकरण?
अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती.सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)