मुंबई : Mumbai Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकणात महाविका आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे सातत्याने नवनवे खुलासे करत आहेत. आता त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार पंच आणि माहिती देणारे किरण गोसावी (KP Gosavi) याचे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) शेअर केले आहे, ज्यामध्ये काशिफ खान (Kashif Khan) याचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच ही समीर दाऊद वानखेडे यांची खाजगी सेना असून त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
समीर वानखेडे यांच्यावर निशाणा
मलिक यांनी ट्विट करून म्हटलंय की, “केपी गोसावी आणि एका इन्फॉर्मरमधील चॅटची ओळख करून देत आहोत ज्यात काशिफ खानचा उल्लेख आहे. काशिफ खानची चौकशी का केली जात नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध आहे?”
कोण आहे काशिफ खान?
नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यापूर्वी काशिफ खान यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, ‘माझा प्रश्न होता ‘दाढीवाला कोण आहे?’ हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा व्यवस्थापकीय संचालक काशिफ खान आहे. फॅशनच्या नावाखाली पोर्नोग्राफी, ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटचा व्यवसाय करतो, असा आरोप मलिक यांनी केला आहे.तसेच काशिफ खानची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून तो एकेकाळी तिहार तुरुंगात सुद्धा होता, अशी माहिती नवाब मलिक यांनी मागे दिली होती.
काशीफ खानने आरोप फेटाळले
काशिफ ने आपल्यावरील आरोपावर मागे प्रतिक्रिया दिली होती. काशिफ यांनी म्हटलं होतं की,
माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत.आणि माझा कोणत्याही पॉर्न किंवा ड्रग रॅकेटशी काही संबंध नाही.
समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
नवाब मलिक यांनी यापूर्वीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी ड्रग्ज पार्टीत दिसणारे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया समीरशी संबंधित असल्याचे सांगितले होते. त्यासोबत ते म्हणाले होते, ‘एका अधिकाऱ्याने सांगितले की, समीर वानखेडेने काशिफ खानवर (Kashif Khan) अनेकदा छापे टाकले होते.’
नवाब मलिक पुढे म्हणाले, “आज सकाळी केपी गोसावी आणि जे खबरी दिल्लीतील आहे त्यांच्या मधिल व्हॉट्सअॅप चॅट मी माझ्या ट्विटर अकाऊंटवर रिलीज केले आहे. के. पी गोसावी ला तो इनफॉर्मर हे काशीफ खान आणि एक व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे.त्याची माहिती देत आहे.गोसावी त्याला सांगत आहे त्याचा फोटो पाठवा.काशीफ खानचा फोटो पाठवण्यात आला.आणि ज्या पद्धतीने फोटोच्या आधारे लोकांची ओळख करून डिटेन करण्यात आलं त्या पद्धतीने काशिफ खान ला का डिटेन करण्यात आलं नाही? त्याला सेफ पसेज का देण्यात आला? काशिफ खान क्रूझवर दोन दिवस काय करत होता?अजूनही काशिफ खान गोव्यात लपून बसलेला आहे.
सूर्या सह ‘जय भीम’ सिनेमा निर्मात्यांना ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16, 2021 13:33 PM
WebTitle – Another blast from Nawab Malik, WhatsApp chat shared on Twitter