Vande Bharat Express वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती म्हणजे सेमी हायस्पीड (semi-high-speed) रेल्वे सेवा आहे.सदर रेल्वे संपूर्णने भारतीय बनावट असणारी असून ही रेल्वे चेन्नई मधिल इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली आहे. भारत सरकारच्या make in india या उपक्रमाच्या अंतर्गत या रेल्वेची निर्मिती करण्यास तब्बल १८ महिने इतका कालावधी लागला असून एकूण खर्च जवळपास १०० कोटी रुपये इतका झाला. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी दिल्ली ते वाराणसी अशी पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली होती.या रेल्वेला अपघात झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली.
Vande Bharat Express वंदे भारत एक्सप्रेस चा अपघात
गुरुवारी सकाळी गुजरात मध्ये वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला अपघात झाला.(Vande Bharat Express Accident) ही ट्रेन म्हशींच्या एका कळपावर आदळली होती, त्यामुळे तिच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले होते. गाडी गांधीनगरच्या दिशेने जात असताना अचानक तीन-चार म्हशी एक्स्प्रेसच्या समोर आल्या. ही घटना गुजरातमधील गैरतपूर आणि वाटवा स्थानकादरम्यान सकाळी 11.20 वाजता घडली होती. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, फायबर-प्रबलित प्लास्टिक (एफआरपी) पासून बनवलेल्या ट्रेनच्या “नाका” चे नुकसान झाले आहे. मात्र, ट्रेनच्या कार्यक्षम भागांचे इंजिन वगैरेचं कोणतेही नुकसान झाले नाही.यानंतर एका दिवसातच कारशेड मध्ये ट्रेन बनवून रुळावर धावली देखील.
वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा अपघाताची शिकार
वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा अपघाताची शिकार ठरली. गुजरातमधील आनंद स्थानकाजवळ शुक्रवारी गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची एका गायीला धडक बसून ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले.आज 07-10-2022 दुपारी 3.44 मिनिटांनी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नव्याने दाखल झालेल्या सेमी-हायस्पीड ट्रेनने काल चार म्हशींना धडक दिली होती ज्यामुळे रेल्वेचा समोरचा भाग बदलावा लागला होता. आजच्या ताज्या घटनेतही ट्रेनचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही मात्र समोरच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे.समोरचे नाक चेपले आहे.आरपीएफ निरीक्षक प्रदीप शर्मा म्हणाले की, रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो रेल्वेच्या कोणत्याही भागात अनधिकृतपणे प्रवेश करणे आणि त्याच्या मालमत्तेचा गैरवापर करण्यावर प्रतिबंध आहे.
या लेखात आपण वंदे भारत एक्सप्रेस च्या वैशिष्ट्याविषयी आणि इतर महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.तेव्हा ही माहिती मिस करू नका.
Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express time table
वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल स्थानक येथून सकाळी 6:10 वाजता सुटते आणि गांधीनगर राजधानीला दुपारी 12:30 वाजता पोहोचते. ट्रेन सुरत येथे सकाळी 8:50 वाजता, वडोदरा येथे 10:20 वाजता आणि अहमदाबाद येथे 11:35 वाजता थांबते.परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस गांधीनगर राजधानी येथून दुपारी 2:05 वाजता सुटेल आणि रात्री 08:35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. अहमदाबाद रेल्वे स्थानकावर दुपारी 2:40 वाजता, वडोदरा येथे दुपारी 4 वाजता आणि सुरत येथे संध्याकाळी 5:40 वाजता थांबेल.
सोमवार,मंगळवार,बुधवार,गुरुवार,शुक्रवार आणि शनिवार या सहा दिवशी ही रेल्वे धावते.
20901 Mumbai Central to Gandhinagar Capital Vande Bharat Express
20902 Gandhinagar Capital to Mumbai Central Vande Bharat Express
या रेल्वेला १६ डबे जोडलेले असून त्यात एकूण १,१२८ प्रवासी प्रवास करू शकतात.
Vande Bharat Express route
सध्या नवी दिल्ली-वाराणसी व नवी दिल्ली-कटरा ह्या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग 180 किमी/तास इतका असून २०२३ सालापर्यंत ७५ गाड्या चालवण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे.
Vande Bharat Express ticket price
मुंबई-अहमदाबाद प्रवासाचे भाडे
एक्झिक्युटिव्ह चेअर कार साठी 2,505 रुपये असेल,
तर चेअर कारचे भाडे 1,385 रुपये असेल.
Top 10 fastest train in India 2022
वंदे भारत एक्सप्रेस – Vande Bharat Express मुंबई-अहमदाबाद, गाडीचा कमाल वेग 180 किमी/तास तर सरासरी वेग 130 किमी/तास
गतिमान एक्सप्रेस – Gatimaan Express दिल्ली ते आग्रा विना थांबा,गाडीचा कमाल वेग 160 किमी/तास तर सरासरी वेग 112 किमी/तास
शताब्दी एक्सप्रेस – Shatabdi Express नवी दिल्ली – भोपाळ , मुंबई – पुणे गाडीचा कमाल वेग 155 किमी/तास
राजधानी एक्सप्रेस – Rajdhani Express नवी दिल्ली – मुंबई , गाडीचा कमाल वेग 140 किमी/तास
हावडा राजधानी एक्सप्रेस – Howrah–New Delhi Rajdhani Express नवी दिल्ली – हावडा (प. बंगाल) , गाडीचा कमाल वेग 135किमी/तास
तेजस एक्सप्रेस – Tejas Express मुंबई (CSMT) – गोवा (करमळी) – गाडीचा कमाल वेग 130 किमी/तास
दुरांतो एक्सप्रेस – Duronto Express मुंबई (CSMT) – नागपूर , गाडीचा कमाल वेग 135 किमी/तास
ह. निजामुद्दीन गरीब रथ एक्सप्रेस – H.Nizamuddin – Garib Rath ,मुंबई (वांद्रे टर्मिनस) ते दिल्ली (हजरत निजामुद्दीन),गाडीचा कमाल वेग 130 किमी/तास
एसी डबल डेकर एक्सप्रेस मुंबई सेंट्रल – अहमदाबाद एसी डबल डेकर एक्सप्रेस Mumbai Central – Ahmedabad AC Double Decker Express ,गाडीचा कमाल वेग 130 किमी/तास
कानपूर शताब्दी एक्सप्रेस – नवी दिल्ली-कानपूर शताब्दी एक्सप्रेस New Delhi-Kanpur Shatabdi Express,गाडीचा कमाल वेग 130 किमी/तास
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
गांधी जी ना ब्रिटिशांकडून 100 रु. पेन्शन भाजप नेत्याचा आरोप
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 07,2022, 21:14 PM
WebTitle – Another accident of Vande Bharat Express|Know Top 10 fastest train in India 2022