मुंबई, 18 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात अण्णा हजारे सक्रिय झाले असून अण्णा हजारे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याने राज्यात चर्चा सुरू झाली आहे. अण्णा हजारे यांनी अजित पवारांच्या विरोधात थेट कोर्टात धाव घेतल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक च्या कथीत 25 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी आज कोर्टात सुनावाई होणार असल्याचे समजते. याच संदर्भातील याचिकेसोबत अण्णा हजारे ही अजित पवार यांच्या विरोधात कोर्टात गेले आहेत.अण्णा हजारे यांच्यावतीने जेष्ठ वकिल सतीश तळेकर हे बाजू मांडणार असल्याचे समजते.
दोन वर्षांच्यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी करण्यात आलेली चौकशी बंद करण्यात आलेली होती. मात्र,मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सदर प्रकरण पुन्हा उघडून घोटाळ्याची अधिक चौकशी करायची असल्याचं मुंबई सत्र विशेष न्यायालयात सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह इतर 76 जणांच्या विरोधात पुढील कारवाई करण्यासाठीचे ठोस पुरावे सापडले नाहीत असं कारण सांगत हे प्रकरण बंद करण्यात यावं अशी मागणी असणारा अहवाल दोन वर्षांच्या पूर्वी कोर्टात सादर करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 10 सप्टेंबर 2020 ला सदर अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. या अहवालाच्या विरोधात या खटल्याचे मूळ तक्रारदार श्री.सुरेंद्र अरोरा यांनी निषेध याचिका दाखल केली होती.
मात्र आता दुसरीकडे ईडीकडून मोठा दावा करण्यात आला होता.ईडीने त्यांच्या अहवालात या प्रकरणी पुरावे असल्याचा दावा केलेला होता. निषेध याचिका आणि ईडीच्या या अहवालाच्या आधारावर या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितलंय. यासंदर्भात आता न्यायालयात निषेध याचिका दाखल करणाऱ्या श्री.सुरेंद्र अरोरा यांनाही त्यांचं उत्तर कोर्टात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी न्यायालयात आज 18 नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे समजते.
कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा हा 25 हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी अजित पवार, खा. विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ महाराष्ट्र बँक चे तत्कालिन अध्यक्ष माणिकराव पाटील,
उपाध्यक्ष बाळासाहे सरनाईक, आनंदराव अडसूळ यांची नावे जोडली गेली होती.
संचालक मंडळाने आर्थिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2011 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.
काय आहे प्रकरण?
संचालक मंडळाकडून साखर कारखाने, सुतगिरण्या तसेच लघुउद्योगांना कोणतेही तारण न घेता नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आलं होतं. कर्ज घेतलेल्या कारखान्यांनी कर्ज फेड न केल्यामुळे बँकेकडून हे कारखाने विक्रीस काढण्यात आले विशेष म्हणजे हे कारखाने या नेते मंडळींनीच विकत घेतले, असा आरोप करण्यात आला. 2005-2010 या कालावधीत या कर्जाचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. 2010 साली सुरेंद्र अरोरा यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती.
Shraddha Murder Case दोन दिवस मृतदेहाचे तुकडे करत होता आफताब, श्रद्धा मर्डर केस
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 18,2022, 10:36 AM
WebTitle – Anna Hazare filed a case against Ajit Pawar