डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीचा यशस्वी लढा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट केला होता. त्यांचे सारे जीवन हे समता संघर्षाचे, परिवर्तनाचे पर्व होते. अस्पृश्यतेचे लढे लढवून, त्यांच्या मुक्तीसाठी त्यांनी क्रांतीकारी संघर्षमय मार्ग अवलंबला अन् चळवळीला प्रगल्भ केले. त्या लढ्याचा इतिहास समजून घेत असतांना त्यांच्या यशाचे जे अनेक घटक आहेत त्यापैकी आंबेडकरी विचार जनमानसांत रुजवणाऱ्या कवी, गायक अन् शाहिरांचे योगदान नाकारता येणार नाही. बाबासाहेबांनी ते स्वतःही मान्य केले आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, माझी दहा भाषणे लोकांमध्ये जनजागृती, क्रांती, आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करत असेल तर, तीच जनजागृती, क्रांती, आत्मविश्वास निर्माण करण्याच काम निर्भिड शाहिरांचा एक जलसा करत असतो.
मनोरंजनाबरोबरचं जनजागृती
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही कलावंतांनी आंबेडकरी विचारांचा प्रचार अन् प्रचार करण्याचा वसा अन् बांधिलकी जपली.
त्यात समाजानेही कलावंतांची पाठराखण केल्यामुळे,कलावंतांनाही आपली कला जोपासता आली हे निर्विवाद सत्य नाकारता येणार नाही.
त्यांनी आपल्या प्रेरक गीतांच्या माध्यमातून,मनोरंजनाबरोबरचं जनजागृती,प्रबोधन अन् नेत्यांच्या सभांपुर्वी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचेही अत्यंत महत्त्वाचे काम केले.
सामाजिक विसंवादावर आघात करतांनाचं परिस्थितीचे विदारक दर्शन घडवून अन्याय अत्याचार, अंधश्रध्दा, जाती भेदाचा पर्दापाश करुन, व्यवस्थेच्या ढोंगीपण, दांभिकतेला नग्न करुन फटकारे ओढले. एवढेचं नाही तर, दिशाहीन चळवळीवरही ताशेरे ओढले. काही कलावंतांनी आपले जीवनचं आंबेडकरी चळवळीला समर्पित केलं होते. बाबासाहेबांचा अनमोल संदेश गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्रात घराघरात पोहचवून, आंबेडकरी चळवळ बुलंद, गतिमान करण्याचा प्रयत्न केला, चळवळीला जीवाचं दान दिले. त्यांचा एक सुवर्णकाळ होता. मात्र, गेली काही वर्षे ती कलाचं लोप पावत चालली आहे असे दिसून येते.
चळवळीला खरचं गत वैभव प्राप्त होऊन, बदलत्या काळात तिला जनाधार मिळेल का ?
पुर्वी, मुंबई अन् ग्रामीण भागात कोणताही कार्यक्रम असेल तर गायन पार्टीचे कार्यक्रम ठरलेलेचं असायचे. एवढेच नाही तर, एखाद्याचे निधन झाले तर त्याच्या स्मृती जागविण्यासाठी गायन पार्टीचे आयोजन केले जात असे. कालांतरांने, रात्रभर चालणाऱ्या जलशांवर वेळेचं बंधन आले. त्यातचं, भरमसाट बिदागीमुळे बदलत्या काळात मनोरंजनाची अन् प्रबोधनाची साधने बदलत गेली. त्यामुळे काही महत्त्वाचे गायक, गितकार सोडले तर, तळागाळातील कलाकार दुर्लक्षित होत गेल्यांने नवोदित होतकरु कवी, गायकांना प्लॅटफॉर्मचं मिळाले नसल्याने ते व्हॉट्सअप, फेसबुकपर्यंत मर्यादित राहिले. पण, बदलत्या काळानुरुप बदललेली मनोरंजनाची अन् प्रबोधनाची साधने आंबेडकरी चळवळीसाठी खरचं सोयीची आहेत का ? ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्यात सुधारणा करुन, आंबेडकरी चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेल्या चळवळीला खरचं गत वैभव प्राप्त होऊन, बदलत्या काळात तिला जनाधार मिळेल का ?
(थोडक्यात घेतलेला आढावा..)
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)