महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही.यावर बुधवारी अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते, तिथे ते भाजप च्या हायकमांडला भेटणार होते अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी दिल्ली दौरा रद्द केला. मात्र, यामागचे कारण त्यांनी दिलेले नाही.
येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितले होते, मात्र दिल्ली दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर राजकीय सत्ताबाजार पुन्हा तापला आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्या समीकरणाचीही लोक आता चर्चा करू लागले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकवेळा दिल्लीला गेले आहेत. बहुतांश बैठकांनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तसेच त्यांचा शपथविधी सोहळा होऊन बरेच दिवस झाले आहेत. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर प्रत्येक वेळी शिंदे आणि फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे बोलले जात असले तरी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
दरम्यान, राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने विरोधकांनीही टीका केली आहे.
मुसळधार पावसाने विदर्भ-मराठवाड्यातील शेतीचे नुकसान झाले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे एकाही जिल्ह्यात पालकमंत्री नाही.
त्याचबरोबर सरकारकडून मदत मिळत नसल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे.
तसेच राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनही अद्याप झालेले नाही.
संजय राऊत म्हणतात पुन्हा आमची सत्ता येणार
तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सत्तेचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कुठलेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. १६ बंडखोर आमदार अपात्र ठरतील.किंवा त्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल.मग ते स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणवतील. अशा परिस्थितीत बंडखोरांपैकी किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला तयार आहेत. त्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं,तर आश्चर्य वाटायला नको.असं संजय राऊत म्हणाले आहेत.
त्यांना स्वप्न पाहू द्या, एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर
संजय राऊतांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात १६६ आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही १२ आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मासिक पाळी प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या हस्ते अंनिस तर्फे वृक्षारोपण
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 28, 2022, 21:00 PM
WebTitle – All is not well between BJP and Shinde group? Eknath Shinde’s Delhi tour canceled