नांदेड:- वंचित बहुजन आघाडी बोंढार हवेली तालुका जिल्हा नांदेडच्या शाखा महासचिव अक्षय भालेराव यांची गावगुंडांकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने वातावरण स्फोटक बनले आहे.akshay bhalerao nanded news गावात तणावपूर्ण वातावरण आहे.विनायक गजभारे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुका यांनी दिलेल्या माहितीनुसार,अक्षय भालेराव यांची हत्या जयंती साजरी केली म्हणून करण्यात आली.
जयंती साजरी केली म्हणून हत्या
वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुक्यातील बोंढार हवेली या गावात गेले कित्येक वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅली निघाली नव्हती कारण या गावातील जातीयवादी मानसिकता असलेल्या प्रस्थापितांनी जयंती काढू दिली नाही. परंतु या वर्षी सदरील गावात वंचित बहुजन आघाडीची ग्राम शाखा दिनांक स्थापण केली आणि गावातील वंचितांना हक्काचे विचारपीठ मिळाले.
जयंती यावर्षी काढली पाहिजे या हेतूने ग्रामशाखेचे अध्यक्ष नितेश भालेराव, अक्षय भालेराव तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी संदेश भालेराव सह यांची संपूर्ण टिम राज्य प्रवक्ते फारुक अहमद सरांकडे चर्चा करण्यासाठी आली सरांनी तात्काळ मला व माझ्या टिमला ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक घोरबांड यांची वेळ घ्यायला सांगितले आणि आम्ही सर्व जण ठाणेदार अशोक घोरबांड यांच्या सोबत चर्चा करून संवैधानिक मार्गाने रीतसर परवानगी घेऊन दिली. व मिरवणूकीत स्वतः फारूक अहमद सर, ठाणेदार अशोक घोरबांड यांच्या सह मी, केशव कांबळे, विजय भंडारे, धम्मदिप एंगडे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.
गावातील सर्व वाद संपुष्टात आला. असे चित्र परवा पर्यंत होते. परंतु काल सायंकाळच्या सुमारास सुनिल सोनसळे यांना गावातील एका महिलेने फोन करून सांगितले की अक्षय भालेराव यांच्या वर हल्ला झाला आहे तुम्ही तात्काळ या. सुनिल सोनसळे यांनी तातडीने फारूक अहमद सरांना फोन करून माहिती दिली लगेच फारूक सरांनी संदेश भालेराव यांना फोन करून विचारणा केली असता हो सर अक्षयला खुप मार लागला आहे त्याला आम्ही विष्णुपुरी येथे हाॅस्पीटलला घेऊन निघालो आहोत असे सांगितले.
सरांनी लगेच महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांना फोन करून हाॅस्पीटलला पोहोचा म्हणून सांगितले
त्याचक्षणी मी, अनिल वाघमारे, केशव कांबळे अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे हि सर्व टिम हाॅस्पीटलला पोहोचलो.
आणि संपूर्ण परीस्थिती लक्षात घेऊन पुढील कारवाई साठी पोलीस स्टेशनला पोहोचलो तोपर्यंत फारुक अहमद सर,
अय्युब खान, हे सुद्धा गावात घटनास्थळी पोहोचले होते. तिथे एस पी, डि वाय एस पी,ठाणेदार यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त होता.
गावातील व अक्षयच्या कुटुंबीयांना समजवुन ग्रामीण पोलीस स्टेशनला अक्षय भालेराव यांच्या हत्येची तक्रार दाखल करण्यासाठी आनले,
आणि तक्रार दाखल करण्याची रितसर प्रक्रिया राबवुन शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला.
नंतर रात्री उशिरा आम्ही सर्व जण घरी आलो. नंतर आज सकाळी पी. एम करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
या सर्व प्रक्रियेत फारुक अहमद सर, गोविंद दळवी, श्याम कांबळे, रवि पंडित, विठ्ठल गायकवाड,
अय्युब खान, मी, डॉ सिध्दार्थ भेदे,इशान खान,अमृत नरंगलकर,अनिल वाघमारे,साहेबराव भंडारे,
धम्मा एंगडे,वैभव लष्करे यांच्या सह नांदेड मधील आंबेडकरी संघटनांचे अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
by विनायक गजभारे
अपडेटेड –
हल्ल्यासाठी अबू सालेम टोळीला सुपारी
दैनिक पुढरीने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला करण्यासाठी अबू सालेम टोळीतील शूटर राजेश हातकणकर याला पाच लाख रुपये सुपारी देण्यात आली होती.माजी महापौर जगदीश गायकवाड यांचा मुलगा सिद्धांत गायकवाड याने ही सुपारी दिल्याची माहिती बातमीत देण्यात आलीय.राजेश हातकणकर याच्यावर एकूण सात हत्याचे गुन्हे दाखल असून,पाच गुन्ह्यात तो पुराव्याअभावी सुटला असून दोन खटले सुरू असल्याची माहिती समोर आलीय.
आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 02, JUN 2023, 15:36 PM
WebTitle – Akshay Bhalerao, General Secretary of Vanchit Bahujan Aghadi District Nanded was brutally murdered