शिळफाटा येथील तीन पुजाऱ्यांनी विवाहित महिला अक्षता म्हात्रे वर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तिला चहामधून गुंगीचे औषध देऊन हा क्रूर प्रकार केला होता. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेल्या या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच विवाहित महिलेला छळल्याप्रकरणी तिच्या सासरच्यांनाही अटक करण्यात आली आहे.
कोपरखैरणे येथील माहेर आणि सीबीडी येथील सासर असलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेची 6 जुलै रोजी घरातून बेपत्ता झाल्यानंतर 10 जुलै रोजी शिळफाटा येथे तिची हत्या झाल्याचे उघड झाले.
अक्षता म्हात्रे सोबत त्यादिवशी नेमके काय घडले ?
घरात झालेल्या वादानंतर ही विवाहित महिला शिळफाटा येथील डोंगरातील मंदिरात गेली होती.
बराच वेळ मंदिरात एकट्या बसलेल्या अक्षताला पाहून तीन पुजाऱ्यांनी चहामध्ये गुंगीचे औषध घालून तिला बेशुद्ध केले.
त्यानंतर त्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती.
पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळच्या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली.
हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला त्या मंदिरातच राहिली. दरम्यान, या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
अत्याचारानंतर खून
पहाटे शुद्ध आल्यावर महिलेला आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचे लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आपले बिंग फुटेल, हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण केली आणि जमिनीवर आपटले व तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या महिलेला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान तिच्या संपर्कातील लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ती शिळफाटा येथील मंदिरात गेल्याचे समजले.
आरोपींची अटक
या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे, संतोष कुमार मिश्रा आणि श्यामसुंदर शर्मा हे असून तीन आरोपींपैकी एक आरोपी फरार झाला होता, तर दोघे तिथेच आढळले. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सासरी झालेल्या छळामुळेच विवाहित महिला घर सोडून गेली होती. त्यामुळे तिच्या सासरच्यांनाही जबाबदार धरून नवरा, सासू, सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायाच्या मागणीसाठी मोर्चा
या विवाहित महिलेला न्याय मिळावा, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी
रविवारी नवी मुंबईकरांनी कोपरखैरने ते वाशी असा भव्य मोर्चा काढला.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 31,2024 |07:50 AM
WebTitle – akshata-mhatre-gangrape-and-murder-case