महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. अजित पवारांनी खुलासा केला आहे की, पाच वर्षांपूर्वी भाजपा नेत्यांसह शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र होती.
टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार,अजित पवारांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांची आठवण सांगितली, ज्या वेळी त्यांनी प्रथमच भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं होतं. त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले होते. या मुलाखतीत अजित पवार म्हणाले, “त्या बैठकीला अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब हे सर्वजण उपस्थित होते.”
भाजप-राष्ट्रवादीच्या मतभेदांवर अजित पवारांचे विचार
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले,
“2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारला बाहेरून समर्थन दिलं होतं.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला बाहेरून समर्थन देण्याची घोषणा केली होती.”
मात्र, हे समर्थन कायमस्वरूपी नसल्याचं राष्ट्रवादीने नंतर स्पष्ट केलं, असं अजित पवारांनी सांगितलं.
शरद पवार भाजपासोबत का गेले नाहीत?
या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “दिल्लीत एका व्यापाऱ्याच्या घरी पाच बैठकांचा दौर झाला. त्या बैठकींमध्ये अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेबही उपस्थित होते. सर्व निर्णय झाले होते.” त्यांनी पुढे सांगितलं, “आरोप माझ्यावर आले, मी ते मान्य केले, इतरांना सुरक्षित ठेवलं.” पण शरद पवार भाजपासोबत का गेले नाहीत, यावर बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “शरद पवार साहेबांच्या मनात काय चाललं होतं, हे कुणालाच समजू शकत नाही,त्यांच्या पत्नीला सुद्धा नाही.” असं त्यांनी नमूद केलं.
बैठकीत अदानींची भूमिका काय होती?
अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रश्न विचारला आहे की , “या बैठकीला गौतम अदानी काय करत होते?” वर्षा गायकवाड म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अदानींचा हात होता. त्यांना धारावीसारखे प्रकल्प हवे होते. महाराष्ट्र सरकार नाही, तर हे अदानी सरकार आहे.”
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्याचा कोणताही प्रश्न नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्यांच्याकडे जास्त आमदार असल्याने त्यांचं पक्षावर नियंत्रण असल्याचं त्यांनी नमूद केलं. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “यावर आम्ही अद्याप विचार केला नाही. सध्या आमचं लक्ष निवडणुकीवर आहे.”
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 13,2024 | 19:52 PM
WebTitle – ajit-pawar-reveals-sharad-pawar-bjp-adani-meeting-details
#AjitPawar #AmitShah #GautamAdani #PrafulPatel #DevendraFadnavis #SharadPawar #BJP #MaharashtraPolitics #Politics #MarathiNews #PoliticalAlliance #MahavikasAghadi #AjitPawarInterview #BJPAlliance #MarathiUpdates #PoliticalUpdates