दिवाळीच्या रात्रीपासूनच फटाके आणि आतिषबाजी अगोदरच दिल्लीत वायू प्रदूषण वाढले असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. गुरुवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. दिल्लीतील हवेची पातळी 363 AQI पर्यंत खालावली.हवामान आणि प्रदूषणाविषयी सांगणाऱ्या सफर या संस्थेच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिल्लीतील लोकांनी २०१९ च्या तुलनेत निम्म्या प्रमाणातही फटाके फोडले तर त्यामुळे राजधानीतील वायू प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची खात्री आहे.
यामुळे वाढले दिवाळीपूर्वी प्रदूषण
४ नोव्हेंबरच्या सकाळपासून दिल्लीत वायू प्रदूषणाचा परिणाम दिसू लागला.
गुरुवारी वाऱ्याची दिशा बदलली आणि शेतकऱ्यांनी जाळलेल्या पाचटाचा धूर दिल्लीपर्यंत पोहोचू लागला.
PM 2.5 पातळी खूपच खराब असण्याची शक्यता आहे
सफर या संस्थेच्या अहवालानुसार, दिल्ली आणि NCR प्रदेशात आतिषबाजी नसली तरीही 4 ते 6 नोव्हेंबर दरम्यान AQI 370 च्या आसपास राहू शकतो. त्याच वेळी, PM 2.5 ची पातळी अत्यंत खराब श्रेणीत असण्याची शक्यता आहे.
पाचट जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाचा 38% परिणाम दिसून येऊ शकतो
शेतकऱ्यांच्याकडून पाचट जाळून होणाऱ्या धुराची समस्या गंभीर होत आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 4 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणासोबतच 20 ते 38 टक्क्यांपर्यंत पाचट जाळून होणाऱ्या प्रदूषणाचाही परिणाम दिसून येईल, असा अंदाज सफरने आधीच व्यक्त केला होता.
दिल्लीत प्रदूषणाचं मुख्य कारणे
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात हरयाणामध्ये शेतीचा कचरा,पाचट जाळत असल्यामुळे दिल्लीत वायू प्रदूषण वाढते, असं म्हटले जाते. पण दिल्लीत प्रदूषणाचं मुख्य कारणे हे वाढत असलेल्या गाड्या, वीज निर्मितीसारखे जड उद्द्योग, वीट भट्ट्यांसारखे लघु उद्द्योग, सतत चालत असलेले बांधकाम उद्द्योग, उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा हे सुद्धा आहेत.
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 04, 2021 10:39 AM
WebTitle – Air pollution rises in Delhi: Danger if half the number of firecrackers compared to 2019