टी-20 विश्वचषकात रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानात जल्लोषाचे वातावरण होते. भारताविरोधातील विजय हा पाकिस्तानसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची, रावळपिंडीसारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर हजारोंच्या संख्येने नागरिक जल्लोष करत होते. पण, यावेळी कराचीत एक मोठी घटना घडली. या जल्लोषादरम्यान हवेत गोळीबार करत असताना 12 जण जखमी झाले आहेत. यात एका पोलिसाचाही समावेश आहे.
टी-20 विजयानंतर पाक फॅन सैराट
कराची पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रविवारी रात्री उत्सवादरम्यान शहरातील विविध भागात गोळीबार करण्यात आला.
यादरम्यान अज्ञात लोकांच्या गोळीबारात एका पोलिस उपनिरीक्षकासह 12 जण जखमी झाले.
कराचीच्या ओरंगी टाउन सेक्टर -4 आणि 4 के चौरंगीमध्ये गोळीबारात दोन जण जखमी झाले.
या दोन घटनांव्यतिरिक्त, कराचीतील सचल गोथ, न्यू कराची, गुलशन-ए-इक्बाल
आणि मलीरसह विविध भागात हवाई गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.
आनंद व्यक्त करत लोक रस्त्यावर नाचले आणि फटाके फोडले.सेलिब्रेशनच्या घटना पाकिस्तानच्या सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की टी -20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना रविवारी पाकिस्तानविरुद्ध होता. या सामन्यात टीम इंडियाला 10 गडी राखून एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानच्या विजयाने, वर्ल्डकपमध्ये भारताच्या हातून सलग 12 पराभव मोडले. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक भागीदारी केली आहे. तसेच, टी -20 मध्ये प्रथमच भारताचा 10 गडी राखून पराभव झाला. बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 25, 2021 20:50 PM
WebTitle – After the victory over India in the T20 World Cup, 12 people were shot during the celebration in Pakistan