17 एप्रिल 2025 | सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया – बे एरियामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात एका अफगाणी तरुणाची भेट आणि त्याच्या भावुक प्रतिक्रियेने सर्वांचे हृदय हलवले. ताहीर, एक अफगाणी रेफ्युजी, जो सध्या अमेरिकेतील एका स्टार्टअपमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे, त्याने भारतातील जातीय असमानता आणि सामाजिक अन्यायाबद्दल ऐकून आपल्या दुःखाच्या अनुभवांनी सामायिक केले.

“डॉ. आंबेडकर कोण?” – ताहीर ची जिज्ञासा आणि सामाजिक सत्याचा साक्षात्कार
कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी ताहीर ने विचारले, “डॉ. बाबासाहेब कोण आहेत? महार, दलित म्हणजे काय? जातीयवाद का अस्तित्वात आहे?” या प्रश्नांना उत्तर देताना त्याला भारतातील वर्णव्यवस्था, अस्पृश्यतेचा इतिहास, आंबेडकरांचे संघर्ष आणि अद्यापही घडणाऱ्या घटना (जसे की खैरलांजी हत्याकांड आणि मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवण्याची घटना) याबद्दल माहिती देण्यात आली.
हे ऐकून ताहीर स्तब्ध झाला. त्याने म्हटले, “आम्ही भारताला एक प्रगत आणि उदारमतवादी देश समजतो, पण अजूनही अशा अन्यायांना सामोरे जावे लागते हे दुःखद आहे.”
“आमच्या पूर्वजांच्या चुकांमुळे अफगाणिस्तानची हालअपेष्टा” – ताहीर चा वेदनादायी अनुभव
ताहीरने आपल्या देशाच्या संदर्भातील वेदना व्यक्त केल्या. “आमच्या पूर्वजांनी शिक्षण, समाजसुधारणा आणि आर्थिक विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज अफगाणिस्तान युद्ध, गरिबी आणि अंधश्रद्धेमध्ये अडकला आहे. मी हे सर्व सोडून अमेरिकेत आलो… तीन वर्षे झाली, पण अजून माझ्या आई-वडिलांना भेटू शकत नाही.” हे सांगताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू ढाळले.
“समाज बदलण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर” – चंद्रशेखर आझाद
त्याच संध्याकाळी चंद्रशेखर आझाद यांनी कार्यक्रमात म्हटले की ,
“जर आजची पिढी समाजसुधारणेसाठी काहीही करत नसेल, तर उद्याची पिढी त्यांना कधीही माफ करणार नाही.”
हा संदेश ऐकून मी ताहीरकडे पाहिल्यावर स्पष्ट झाले की, जगभरातील तरुणांना आपापल्या समाजातील समस्यांबद्दल जागरूक होण्याची गरज आहे.
ताहीरचा प्रवास: रॅफ्युजी ते सॉफ्टवेअर इंजिनियर
अमेरिकेच्या रेफ्युजी प्रोग्रामअंतर्गत ताहीर ला नोकरी, आर्थिक मदत आणि भविष्यात ग्रीन कार्डची संधी मिळाली आहे.
तरीही, तो आपल्या मातृभूमीच्या आठवणीतून मुक्त होऊ शकत नाही.
त्याच्या कथेने दाखवून दिले की, युद्ध आणि सामाजिक अन्याय ही केवळ एका देशाची नव्हे, तर संपूर्ण मानवतेची समस्या आहे.
“आमच्या देशांना शिक्षण, समता आणि मानवतेची आवश्यकता आहे… नाहीतर आमच्या पिढ्या अशाच वेदना भोगत राहतील,” – ताहीरचा संदेश.

महेंद्र शिनगारे
फाऊंडर कार्व्हर फार्मस
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 17,2024 | 12:25 PM
WebTitle – Afghan youth Tahir’s heartwarming story shocked to hear Indian social injustice