पुणे – भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगली प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू आहे त्या संदर्भात – 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या मुळाशी जाऊन त्यामागील हेतू व त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना दोषी ठरविण्यात यावे. तसेच शासकीय यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी व भविष्यात कुठेही अशा घटना घडू नयेत,याकरिता ठोस शिफारशी व कारवाई करण्याची मागणी करणारे प्रतिज्ञापत्र ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर दाखल केले.ॲड.किरण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार..
ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव हल्ल्या मागील तत्कालिन परिस्थिती, त्यातून हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत निर्माण केलेला संभ्रम ई. बाबी सविस्तरपणे विषद करून या दंगलीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या प्रतिज्ञापत्रात केली.
तसेच ही दंगल रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांनीं योग्य प्रकारे काम न केल्याने दंगल भडकली, म्हणून त्यांच्यावरील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली.
याशिवाय खालील मुद्द्यांकडे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाचे लक्ष वेधले.
▪️मिलिंद एकबोटे यांना अटक झाली.संभाजी भिडे यांना अटक का नाही ?
▪️न्या. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एल्गार परिषदेला शहरी नक्षलवादी असे का संबोधण्यात आले ?
▪️गुप्तचर यंत्रणांनी दंगल रोखण्यासाठी काय कारवाई केली ?
▪️मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे CDR तपासावे.
▪️तत्कालिन मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलिस अधिक्षक पुणे (ग्रामीण), पोलिस कमिशनर पुणे यांना साक्षीला बोलाविण्यात यावे.
ई. महत्वाच्या बाबी ॲड.प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या आहेत. पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
भीमा कोरेगांव शौर्य दिवस
भारतातील बहुजन आंबेडकरी समाज प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस साजरा करत असते.1 जानेवारी 2018 साली या घटनेला 200 वर्षे पुर्ण झाली होती,यानिमित्ताने बहुजन आंबेडकरी समाजात मोठा उत्साह होता.मात्र काही जातीयवादी पिलावळींनी या दिवशी गोंधळ माजवून दंगल घडविण्याचा प्रयत्न केला,यात अनेक लहान मुलं स्त्रिया वृद्ध यांना मारहाण झाली.अनेकजण जखमी झाले तर कित्येक खाजगी गाड्या फोडण्यात आल्या होत्या.यानंतर या घटनेला वेगळे वळण लावत यात शहरी नक्षलवाद थिअरी घुसडून यातील मुख्य आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.सध्या यावर चौकशी आयोगाकडून चौकशी सुरू आहे.
भीमा कोरेगाव ची लढाई, महार सैनिक आणि काही प्रवाद
1 जनवरी 1818 भीमा कोरेगांव इतिहास वाचा
भीमा कोरेगाव इतिहास मराठी वाचा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 26,2023 | 16:56 PM
WebTitle – Adv Prakash Ambedkar gave a big update on the Bhima Koregaon case