मुंबई, दि. 05 – राज्यात कोरोनाच्या रुग्ण वाढीने मागील वर्षाच्या तुलनेत उच्चांक गाठला आहे.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू होणार आहे. तर दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जयंती साजरी करताना शासनाने ठरवून दिलेले आदेश नियमाप्रमाणे जयंती साजरी करावी असे आवाहन केले आहे.
येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल 2021 ) संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चैन ची नियमावली जारी केली आहे. (Maharashtra Lockdown All Rules and Guidelines) किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
जयंती याही वर्षी काटेकोर नियम पाळून
शासनाने जारी केलेल्या नियमावली मुळे अनेक सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आणि सणांवर देखील प्रभाव पडला असून त्यामुळे असे सन उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत.नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल या दिवशी देशविदेशात मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरी होणारी जयंतीसुद्धा याही वर्षी काटेकोर नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन विविध स्तरावरून केले जाते आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
यांनी तमाम भारतीय जनतेला जयंती साजरी करताना शासनाने ठरवून दिलेले आदेश नियमाप्रमाणे
जयंती साजरी करावी असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने पुन्हा लॉकडाऊन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे.
१४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय.
तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा.
हे ही वाचा.. भारताचे संविधान: मानवी हक्कांचा प्रखर जाहीरनामा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 04 , 2021 20 : 55 PM
WebTitle – Adv. Balasaheb Ambedkar’s appeal to the people regarding Dr.Babasaheb Ambedkar’s birthday 2021-04-05