नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या वकिलावर लागला मोक्का, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करणारे वकील सतीश उईके अडचणीत आले आहेत. सतीश उईके सध्या हवाला प्रकरणी मुंबईच्या आर्थर जेलमध्ये बंद आहेत.पोलिसांनी सतीश उईके यांच्यासह सहा जणांविरुद्ध मोक्का Mcoca Act अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे की, फडणवीसांच्या विरोधात आवाज उठवणे उईके यांच्यासाठी मोठी घोडचूक ठरले आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सतीश यांची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. एनआयटी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या वकिलावर लागला मोक्का
नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे विभागीय अभियंता पंकज पाटील यांनी उईके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंगळवारी वकील सतीश उईके आणि अन्य सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ मोक्का (Mcoca Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी मिळून मूळ मालक विठ्ठल ढवळे यांच्या मालकीच्या जमिनीचे बनावट कागदपत्रं बनवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.
पोलिसांनी मोक्का प्रकरणात प्रदीप उईके (भाऊ), माधवी उईके (पत्नी), सुभाष मणिलाल बघेल (श्रीरंग हाऊसिंग को-ऑपरेटिव्हचे अध्यक्ष), चंद्रशेखर नामदेवराव माटे आणि उईके यांच्या कुटुंबातील दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चंद्रशेखर महादेवराव उईके, मनोज महादेवराव उईके यांचा यात सहभाग होता.गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सतीश उईके यांच्या ठिकाणांवर छापे टाकून त्यांना अटक केली होती. 11.5 कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणामध्ये ईडीकडून सतीश उईके ना अटक करण्यात आली होती. दरम्यान, एप्रिलपासून मुंबई तुरुंगात असलेल्या वकील सतीश उईके यांच्या भावाच्या घरावरही ईडीने छापे टाकले.
देवेंद्र फडणवीस यांचेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती
अधिवक्ता वकील सतीश उईके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर
2014 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात नोंदवलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप केला होता.
या संदर्भात उके यांनी जिल्हा न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
वकील सतीश उईके हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.
फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात
नाना पटोले यांच्या वतीने वकील सतीश उईके न्यायालयात हजर झाले होते.
रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्क ला 6 रु.साठी गमवावी लागली नोकरी…जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 17,2023 | 10:06 AM
WebTitle – Action under Mcoca against lawyer Satish Uike who complained against Devendra Fadnavis