मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरण आता राजकीय पातळीवर स्थिरावले आहे.अन नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना रंगवला जात आहे.यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी सांगितले की एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (एसएलसी) हाती लागले असून शाळेच्या दाखल्यावर त्यात ते ‘मुस्लिम’ असल्याचे स्पष्ट होत आहे.या दाखल्यामुळे आता समीर वानखेडे नक्की कोण त्यांची धार्मिक ओळख नक्की कोणती हा संभ्रम वाढला आहे.
समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा समोर येत आहे
आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा समोर येत आहे.शेजारी रहात असणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला क्षुल्लक वादावरून त्यांनी 27 ए या कलमाखाली फसविण्याचे काम केले,त्यांनी कोर्टातील जामीन अर्जात अशी मागणी केली आहे की इमारतीच्या आसपासचे सिसिटीव्ही तपासले जावेत,त्यात दिसेल की त्यांच्या घरी कोणतेही रेड झाली नाही.समीर वानखेडे किंवा त्यांचे कोणतेही अधिकारी हे घरात येऊन तपासणी करताना दिसत नाहीत,तर ते केवळ बाहेर कंपाऊंड मध्ये फिरत आहेत.मुलाला घरातून बोलावून घेतलं.आणि बोगस केस करून त्याच्याकडे ड्रग्ज मिळाले अशी केस फ्रेम करण्यात आली.
ज्या मुलीशी पहिले लग्न करून नंतर घटस्फोट दिला तिच्या भावाला अडकवले
या व्यतिरिक्त आणखी एक गंभीर विषय आहे.ज्या मुलीशी पहिले लग्न करून नंतर घटस्फोट दिला होता.
वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी कुठेतरी समोर येऊन लोकांसमोर याचा भांडा फोड करेल या भीतीपोटी म्हणून एका ड्रग्ज पेडलकर च्या माध्यमातून त्यांचा जो कझिन भाऊ आहे.त्याच्याकडे एक ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून ड्रग्ज ठेवण्यात आले.राज्यसरकारची एजन्सी एनसी आहे त्यांच्याकडून त्याला अटक करण्यात आली.आजही तो मुलगा तुरुंगात आहे.त्याला अडकविल्यानंतर त्या कुटुंबाला सुद्धा समीर वानखेडे हे धमकी देत होते.जर माझ्यासाठी तुम्ही समोर आले तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज केसमध्ये तुरुंगात टाकेन.
“वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्यावर एक करोड पंचवीस लाखाचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.त्याच्यावर सूनवाई झाली,सूनवाई दरम्यान जज साहेबांनी ऑब्जर्वेशन मांडले की एक आमदार असताना,एका पक्षाचा प्रवक्ता असताना याच्यात कुठतरी सखोल बघायला पाहिजे होतं.या ऑब्जर्वेशन नंतर आम्ही महानगरपालिकेचे सगळे कागदपत्रे तपास केला आणि ते पत्राद्वारे मागवून घेतले. साक्षांकीत प्रती, शाळेचा दाखला, एडमिशन फॉर्म इत्यादी उपलब्ध करून घेतले आणि ते परवा आम्ही जज साहेबांच्या समोर ठेवल्यानंतर आज दुपारी चेंबर मध्ये सुनावणी ची तारीख देण्यात आली. समीर वानखेडे यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (एसएलसी) हाती लागले असून शाळेच्या दाखल्यावर त्यात ते ‘मुस्लिम’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
माझ्या बोलण्यावर बंदी घालावी, ट्विट करण्यापासून रोखावे, अशी मागणी त्यांनी कोर्टापुढे केली. मुख्य याचिकेवर नंतर सुनावणी आज पुन्हाहोणार आहे.
भाजप माजी आमदाराने कंगना राणावत वर केला गुन्हा दाखल, म्हणाले..
जयभीम चित्रपट वाद: हीरो सूर्याला मारण्याची धमकी;पोलिस तैनात
पोचिराम कांबळे : एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 18, 2021 18:56 PM
WebTitle – According to Sameer Wankhede’s school certificate, he is a Muslim – Nawab Malik