मुंबई:भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशन थांबल्याची उच्च न्यायालयाकडून कालच दखल घेण्यात आली असून न्यायालयाने स्वत:हून या संबंधित वृत्त देणाऱ्या दैनिक ‘लोकसत्ता’मधील बातमी जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतली असल्याचे काल स्पष्ट झाले.दैनिक लोकसत्ताने तशी बातमी दिलली आहे.नाशिक येथे सध्या मराठी भाषिक साहित्य संमेलन भरलेलं असून या संमेलन कार्यक्रमात हजर राहण्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी अनुसूचित जातीच्या साठी विशेष सहाय्य योजना म्हणून राखीव असणाऱ्या निधीतून केला जावा असे आदेश देण्यात आले आहेत.
साहित्य संमेलन लेखकांचा खर्च अनुसूचित जातीच्या निधीतून
नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड ग्रंथ प्रकाशन साधने प्रकाशन समितीच्या दुसऱ्या टप्पप्पयातील 13 खंडांच्या 50 पुस्तकांचे प्रकाशन होणार असून सदरील संमेलनामध्ये या ग्रंथांचे लेखन, संपादन, भाषाांतर करणारे लेखक या कार्यक्रमासाठी नाशिक येथे उपस्थित राहणार असल्याने त्याांची निवास व्यवस्था, प्रवास खर्च व इतर खर्चासाठी ₹5,00,000/- (रुपये पाचलक्ष फक्त) इतका निधी हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जातीसाठी विशेष सहाय्य योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना थोर पुरुषांच्या साहित्याचे प्रकाशन लेखाशीर्षाखाली सण 2021-2022 च्या उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा.असे म्हटले आहे.
तीन दिवसीय चालणाऱ्या साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड ग्रंथांचे लेखन, संपादन, भाषांतर करणारे लेखक
अशा उपस्थित राहणाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, प्रवास खर्च व इतर खर्चासाठी ₹5,00,000/- (रुपये पाचलक्ष ) इतका निधी
हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जातीसाठी विशेष सहाय्य योजनेतून भागवला जाणार आहे.
दुसरीकडे शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने २०१७ मध्ये
आंबेडकर साहित्याच्या नऊ खंडांच्या नऊ लाख प्रती छापण्याचे शासकीय मुद्रणालयाला आदेश दिले,
त्यानुसार ५ कोटी ४५ लाख रुपयांचा कागदही खरेदी करण्यात आला.
मात्र मागील चार वर्षांत केवळ ३३ हजार प्रतींची छपाई करण्यात आली
व त्यापकी प्रत्यक्ष ३६७५ प्रती वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या.
शासकीय मुद्रणालयांतील जुनी यंत्रे व अपुरे मनुष्यबळ ही त्यामागची कारणे असल्याचे सांगितले जाते.असे लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे.
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
( @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 03, 2021 13: 35 PM
WebTitle – Accommodation, travel expenses in lakhs; from SC funds