नाशिक, प्रतिनिधी : रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी दान पारमिता फाउंडेशन संस्थेतर्फे त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय धम्मलिपि व शिल्पकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील लेणी अभ्यासकांनी व धम्मलिपि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
एक काळ असा होता की लेणींकडे कुणी फिरकत नव्हते पण आता लेणी संवर्धन चळवळ जोम धरू लागली आहे,
आपला वारसा जपण्यासाठी तरुण पिढी सज्ज होत आहे, अनेक ठिकाणी अनेक संघटना कार्यशाळेचे आयोजन करत आहे त्यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे,यापूर्वी जे अतिक्रमणे झाली ती आता होण्याची शक्यता कमी आहे तरीही जागृत राहणे गरजेचे आहे,
या कार्यशाळेचे आयोजन दान पारमिता फाउंडेशन मार्फत केले होते.
त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक सविस्तर माहिती
यावेळी मार्गदर्शक म्हणून आद. अतुल भोसेकर सर यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने त्रिरश्मी बुद्ध लेणी का म्हटले पाहिजे ह्याचा पुरावा शिलालेखात आढळतो, लेणी क्रमांक १० मध्ये त्रिरश्मी पर्वत हे नाव आढळते व सकाळच्या कोवळ्या रेशमी किरणांनी ही लेणी रेशमी भासते म्हणून त्याकाळी त्रिरश्मी लेणी म्हटले गेले असावे अशी माहिती आयु. भोसेकर सरांनी यावेळी दिली.
शिल्पकलेचा उगम, लिखाणाची परंपरा कशी सुरवात झाली याची सखोल माहिती ह्या कार्यशाळेतून मिळाली,
यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी एक वही एक पेन दान पारमिता फाउंडेशनला भेट म्हणून दिला,
हे साहित्य गरजू गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येईल,धम्मलिपि शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना
धम्मलिपि सर्टिफिकेट वाटप करण्यात आले,विद्यार्थ्यांकडून शिलालेख वाचन करून घेण्यात आले,
याप्रसंगी उपस्थित लेणी संवर्धक तसेच धम्मलीपी अभ्यासक सुनील खरे सर, प्रविण जाधव सर व यांनी शिलालेख वाचन करून शिलालेखांचा अर्थ सुस्पष्ट करून सांगितला.संतोष आंभोरे यांनी उपस्थित बांधवांना धम्मदानाचे महत्त्व व दान पारमिता काय असते याबाबतीत माहिती दिली,
याप्रसंगी बिपीन रुके, प्रमिला अहिरे, सुषमा कदम, अर्चना गायकवाड, ज्योती हिरे, रजनी गांगुर्डे, सुनंदा साबळे, दिलीप वासनिक, रवी पडवळ, माधवी शिरसाठ, मंगल बोढारे, अनिल उबाळे, आकाश हजारे, रुपाली गायकवाड, बिपीन गायकवाड, अनिल बागुल, व ईतर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
मनसर विश्व विद्यापीठ येथे MBCPR टीम तर्फे कार्यशाळा संपन्न
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 23,2022, 15:56 PM
WebTitle – A one-day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm