देशभरात लोक होळी साजरी करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील एक लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुस्लिम कुटुंबावर जमावाने जबरदस्तीने रंग फेकतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये रस्त्यावरील काही मुले बाईकवरून जात असलेल्या मुस्लिम कुटुंबाला थांबवतात आणि नंतर त्याच्यावर रंगीत पाणी टाकतात. या घटनेवेळी त्या तरुणासोबत दोन महिलाही बसल्या होत्या. त्यांच्यावरही जबरदस्ती रंग उडवण्यात आला.या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुस्लिम कुटुंबावर जमावाने जबरदस्तीने रंग फेकला
बिजनौरच्या धामपूर येथील खारी विहिरीवर (खारी कुआं) होळी खेळणाऱ्या तरुणांनी एका मुस्लिम कुटुंबाला पकडून रंग लावला,
आई, मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने रोखले आणि नकार देऊनही त्यांच्यावर रंग उडवला गेल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ कालचा आहे जो मयूर कुमार पुष्पक आणि आकाश जोशी नावाच्या तरुणांनी त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे,
व्हिडिओमध्ये दिसणारे चेहरे सहज ओळखता येतात.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसानी तपास करून या तरुणांना अटक करत कारवाई केली आहे,
आणि अशा प्रकारे सामान्य नागरिकांना इतर धर्मातील नागरिकांना त्रास देऊ नये,अपमान करू नये असे आवाहन केले आहे.
काय म्हणाले बिजनौरचे पोलीस अधीक्षक?
मुस्लिम कुटुंबावर जमावाने जबरदस्तीने रंग उडवल्याचा बिजनौरचा एक व्हिडिओ आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. काही लोक मोटारसायकलवरून जाणाऱ्या कुटुंबाला थांबवून त्रास देत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. त्याना रोखले जात आहे आणि जबरदस्तीने विद्रुपीकरण केले जात आहे.त्यांच्यावर जबरदस्तीने रंग फेकला जात आहे.
बिजनौर पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे या व्यक्तींची ओळख पटवली जात आहे. तेथील सीओला पीडितेच्या कुटुंबीयांना भेटून तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. व त्यावर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिजनौर पोलीस तुम्हा सर्वांना विनंती करते. होळी हा पवित्र सण असून कुणावरही जबरदस्ती रंग लावण्याची सक्ती कोणी करू नये. या पवित्र सणात कोणालाही त्रास देऊ नका. कोणी कोणाला त्रास दिल्यास पोलिस त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 24,2024 | 13:34 PM
WebTitle – A Muslim family of Bijnor was mobbed Color thrown forcibly, video goes viral, FIR filed