मध्य प्रदेश : आई वाघाशी भिडली ; पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी जन्मदात्री आई काहीही करू शकते,म्हणतात ना मरण्याच्या दारातूनही ती आपल्या मुलाला सोडवून आणू शकते.अशीच घटना मध्य प्रदेशातील एका गावात घडली आहे.एक महिलेला जीवाची पर्वा न करता वाघाशी भिडली अन वाघाच्या तावडीतून 15 महिन्यांच्या बाळाची सुटका केली. उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील माला बीट अंतर्गत रोहनिया गावात रविवारी सकाळी ही घटना घडली. वाघाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जात असल्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलाला वाचवण्यासाठी आई वाघाशी भिडली

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना चौधरी नावाची महिला आपला मुलगा रविराज याला शौच करण्यासाठी शेतात घेऊन गेली होती, त्यावेळी वाघाने त्याच्यावर हल्ला करून मुलाला जबड्यात पकडलं आणि फरफटत घेऊन जात होता,यावेळी महिलेने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी वाघाने तिच्यावरही हल्ला केला. महिलेने सांगितले की ती आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. वाघासोबतचा हा संघर्ष जवळपास 25 मिनिटे चालला असं सांगण्यात येत आहे.यादरम्यान तिने आरडाओरडा करून आवाज केला असता काही ग्रामस्थ तेथे पोहोचले.त्यांनी मग वाघाला जमेल त्याप्रकारे हाकलण्याचा प्रयत्न केला.
गावकऱ्यांनी वाघाचा पाठलाग केल्यावर तो मुलाला सोडून जंगलात पळून गेला. महिलेचे पती भोला प्रसाद यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीच्या पाठीवर, हाताला आणि पाठीला दुखापत झाली आहे, तर मुलाच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. वनरक्षक रामसिंग मार्को यांनी सांगितले की, मानपूर येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर महिला आणि तिच्या मुलाला तात्काळ उमरिया येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
उमरियाचे जिल्हा दंडाधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी जिल्हा रुग्णालयात महिला आणि तिच्या मुलाची भेट घेतली. दोघांना जबलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. वनक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
टाटा ग्रुप चे सायरस मिस्त्री यांचा अपघात कसा झाला? गाडीचे फोटो आले समोर
आज प्रधानमंत्री मोदींवर टीका केल्याने तुरुंगात जाण्याचा धोका आहे – माजी न्यायाधीश
मोफत धान्य घोषणा राजकीय आणि कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात,जाणून घ्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 06,2022, 19:35 PM
WebTitle – A mother fought with a tiger; A mother can do anything to save her child