उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहाबाद सीएचसीमध्ये शनिवारी रात्री उशिरा एका महिलेने चार हात आणि चार पायांच्या मुलाला जन्म दिला. शनिवारी रात्री उशिरा बाळाचा जन्म नॉर्मल प्रसूतीमध्ये झाला.आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.
शहााबादमधील मांगलीपूर गावात राहणाऱ्या संजयची पत्नी करीना हिला प्रसूतीच्या त्रासामुळे शहाबाद सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले होते. संध्याकाळी उशिरा करिनाने या मुलाला जन्म दिला. शाहबाद CSC च्या स्टाफ नर्स रीमा देवी करीनाची काळजी घेत होत्या.
प्रसूतीदरम्यान करिनाने एका एब्नॉर्मल मुलाला जन्म दिला, हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.
त्यांनी तत्काळ याची माहिती करीनाच्या कुटुंबीयांना दिली. मुलीला पाहिल्यावर कुटुंबीयांचा विश्वास बसेना, ते अस्वस्थ झाले.
त्याचवेळी चार हात पाय असलेल्या मुलाची माहिती परिसरात पसरली.
मुलीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आसपासच्या भागातील लोक जमा झाले होते.
कोणी या मुलीला देवाचा अवतार म्हणत आहेत, तर कोणी देवीच्या अवताराच्या रूपात निसर्गाचा करिष्मा बोलत आहेत.
काय म्हणाले डॉक्टर?
हा कोणताही दैवी चमत्कार नसून जुळ्या मुलांच्या जन्माची बाब असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश बाबू यांनी स्पष्ट केले आहे. दोन जुळ्यापैकी एका मुलाच्या शरीराचा विकास नीट झाला नाही,त्याचे शरीर दुसऱ्या मुलाच्या शरीरावर वाढलं, त्यामुळे एका मुलाचे हात-पाय जास्त होते.त्याचे हातपाय दुसऱ्या मुलाच्या पोटाशी जोडले गेले.बाळाला शाहबाद येथून हरदोई आणि नंतर लखनौला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
वैद्यकीय भाषेत याला पॉलीमेलिया म्हणतात
वैद्यकीय भाषेत या स्थितीला पॉलिमेलिया म्हणतात, जेथे ग्रीक पॉली- म्हणजे “अनेक” आणि -मेलियाचा अर्थ “अंग” असा होतो. जन्मजात विकृतीचा परिणाम अतिरिक्त, निरुपयोगी हात, पाय, हात किंवा पाय यांमध्ये होतो जे सामान्यतः आकुंचन पावलेले दिसतात. काही प्रकरणे जोडलेल्या दुहेरी परिस्थितींमधून उद्भवतात ज्यामध्ये एका जुळ्याचा विकास अयशस्वी होतो आणि फक्त काही अवयव अविकसित राहतात.
असे प्रकरण या वर्षाच्या सुरुवातीलाही समोर आले होते. 17 जानेवारीला बिहारच्या कटिहारमध्ये 4 हात आणि 4 पाय असलेल्या मुलाचा जन्म झाला. त्याच वेळी, गोपालगंजमध्ये डिसेंबर 2021 मध्ये तीन हात आणि तीन पाय असलेल्या एका मुलाचा जन्म झाला. बैकुंठपूरच्या रेवतीथ येथील रहिवासी मोहम्मद रहीम अली यांची पत्नी रबिना खातून यांनी मुलाला जन्म दिला.
उत्तर प्रदेश बिहार अशा राज्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत,
त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार लोकांनी यामागचे आरोग्य विषयक शास्त्रीय कारण शोधून काढण्याचे आव्हान
वैद्यकीय क्षेत्रासमोर उभे ठाकले आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
न्यायाधीश यांना बदली ची धमकी : न्यायाधीश म्हणाले – घाबरत नाही
नुपूर शर्मा प्रकरण:सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वैयक्तिक हल्ल्याने नारा
जम्मू मध्ये पकडलेला लष्करचा दहशतवादी भाजप चा आयटी सेल प्रमुख
Patna civil court Bomb Blast न्यायालयात पुरावा म्हणून आणला बॉम्ब, स्फोटात अधिकारी जखमी
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 06, 2022, 14:10 PM
WebTitle – A child with four arms and four legs; People said ‘incarnation of God’