आंतरजातीय प्रेम संबंधाच्या संशयावरून 34 वर्षीय,दलित महिलेला अर्धनग्न मारहाण करून मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल.
खेड : येथील शिरोली गावात राहणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाजातील 34 वर्ष वयाच्या महिलेला तसेच तिच्या दोन मुलांसह इतर दोन जणांना अपहरण करून घेऊन जाऊन मारहाण करणे, दलित महिलेला अर्धनग्न करून मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, तसेच 19 वर्षीय युवकाला गळफास देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार जातीय कारणातून घडला असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित कुटुंबीयांसह रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे , जिल्हाध्यक्ष किरण सोनवणे यांनी पुणे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे व पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील व खेडचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौधरी यांची भेट घेऊन सदर प्रकरणी दाद मागितली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर ॲट्रॉसिटी एक सह इतर विविध कलमान्वये आठ जणांविरुद्ध खेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दडपण्यासाठी फिर्यादीच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा
सदर ॲट्रॉसिटीचा व मारहाणीचा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी फिर्यादीच्या मुलाविरुद्ध ७ जानेवारीला खोटा गुन्हा खेड पोलिस स्टेशनला दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या वेळी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय हे गुन्हा घडल्या पासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असतानाही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. याबाबत देखील सविस्तर तपास करून निर्णय घेण्यात येईल असे पोलिसांनी शिष्टमंडळाला आश्वासित केली आहे.

सदर घटनेची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली यात रिपब्लिकन सेनेचे महेश शिवशरण , सुमित्राताई म्हस्के , दलित स्वयंसेवक संघाचे बबनराव पाटोळे , विकास शिंदे , माऊली बोराडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी याघटनेचा निषेध नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कळावे
राहुल डंबाळे , अध्यक्ष
रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र
9822917119
ऑक्सफॅम अहवाल गरीब आणि श्रींमत याच्यात दरी वाढविणारे “सर्व्हायवल ऑफ द रिचेस्ट’”
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 18,2023 18:55 PM
WebTitle – A case registered for trying to kill a Dalit woman by beating her half-naked