नवी दिल्ली, 15 एप्रिल : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या दिवशी मेसमध्ये मांसाहार देण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती.त्यानंतरही हा वाद शांत होताना दिसत नाही. जेएनयु प्रशासन आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहे. जेएनयू प्रशासनाने या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.या पार्श्वभूमीवर हिंदू सेना च्या (Hindu Sena saffron flag ) वतीने जेएनयूच्या मुख्य गेटवर भगवे झेंडे आणि भगवे जेएनयूच्या पोस्टर्समुळे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
हिंदू सेना यांच्या वतीने झालेल्या या JNU मध्ये घडलेल्या घटनेवर दिल्ली दक्षिण पश्चिम चे डीसीपी मनोज सी यांनी शुक्रवारी सांगितले की झेंडे “त्वरीत काढून टाकण्यात आले”. “आज आमच्या लक्षात आले की जेएनयूच्या आजूबाजूला काही झेंडे आणि बॅनर रस्त्यावर लावण्यात आले आहेत. ते तातडीने काढून टाकण्यात आले आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे,” असं त्यांनी म्हटलंय.जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलीस रामनवमी नंतर चिघळलेल्या या संघर्षावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.
जेएनयूमध्ये मांसाहार मुद्यावरून वाद का झाला?
रविवारी जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर इतर विद्यार्थ्यांना मांसाहार खाण्यापासून रोखल्याचा आरोप केल्याने वाद झाला होता. एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांवर कावेरी वसतिगृहाच्या कॅम्पसमधील मेस कर्मचार्यांना मारहाण करून त्यांना चिकन पुरवण्यापासून रोखल्याचा आरोपही करण्यात आला होता.दुसरीकडे ABVP ने आरोप केला की डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या प्रार्थनेत व्यत्यय आणला.
अभाविपच्या सदस्यांनी मेस कमिटी सदस्य आणि इतर विद्यार्थ्यांवर हल्ला केला.
त्यांनी दगड आणि विटा फेकून, दुचाकी आणि मेसचे काचेचे दरवाजे फोडले आणि महिला आणि पुरुष जखमी केले.
त्यावेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले मात्र त्यांनी हस्तक्षेप केला नाही असा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आला.
पोलिसांनी काय म्हटलं ?
घटनास्थळी मूक प्रेक्षक असल्याचा आरोप नाकारला आहे आणि सांगितले की त्यांना पीसीआर कॉल मिळताच त्यांनी त्यांच्या टीमसह धाव घेतली आणि हिंसाचार आणखी वाढणार नाही याची खात्री केली.”आम्ही विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल आणि त्यानुसार आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
Amy Wax या युएस प्राध्यापिकेचं ब्राह्मण स्त्री विषयी वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
मशीद भोंगा प्रकरण : सुजात आंबेडकर याना मनसे चं प्रत्युत्तर
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 15, 2022 14:30 PM
WebTitle – Saffron flags at the gate of JNU on behalf of Hindu Sena; Possibility of simmering disputes