वर्धा: आपल्या विनोदी इरसाल शैलीत वऱ्हाडी भाषेतून स्पर्धा परीक्षांची शिकवणी घेणारे आणि सोशल मीडिया युट्यूब ,ट्विटर फेसबुकवर लोकप्रिय असणारे नीलेश कराळे मास्तर आपल्याला माहितच आहेत.अनेक अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा त्यांचा हातखंडा आहे.”लक्ष द्या बे पोट्टे हो” अशी सुरुवात करत क्लिष्ट विषय सुद्धा हसत खेळत शिकवणारे नीलेश कराळे मास्तर यांनी आता राज ठाकरे यांना थेट आव्हान उभं केलंय.तुम्ही भोंग्यात अजान,हनुमान चालीसा वाजवाल तर आम्ही राष्ट्रगीत लावू असं म्हणत कराळे मास्तरांनी आता मशिदिवरील भोंगा प्रकणात उडी घेतलीय.
धार्मिक राजकारणाला तरुणांचा विरोध आश्वासक
गुढी पाडाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दादर,छत्रपती शिवाजी पार्क येथे सभा झाली.या सभेत त्यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा (Hanuman chalisa ) म्हणा असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे.मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला,त्यांना पोलिसांनी अटक केली.भोंगा प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी मनसेला थेट आव्हान दिले आहे.
सुजात आंबेडकर काय म्हणाले?
माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे…फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे..जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला.. त्यांनी टीशर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये.. मग हनुमान चालीसा म्हणा..मला एकही एक बहुजन माणूस तिथे नकोय तिकडे.
राज साहेबांना ही कळकळीची विनंती..तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या…तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा..पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो..की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी! जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..
यानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यानीही यावर भूमिका घेत प्रत्युत्तर दिलं की मी संपलेल्या पक्षावर उत्तर देत नाही. असे म्हणत त्यांनी धार्मिक मुद्यावरून केल्या जाणाऱ्या राजकारणावर टोला लगावला.राजकारणातील तरुण नेते ज्याप्रमाणे विकासाचे मुद्दे मानवी जीवनातील मूलभूत प्रश्न यावर फोकस करत आहेत.हे राज्यातील चित्र कमालीचे आश्वासक वाटते आहे.याच अनुषंगाने कराळे मास्तरांनी सुद्धा यावर राष्ट्रगीताचाच मुद्दा उपस्थित करून या मुद्याची हवाच काढून घेतल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय म्हणाले कराळे मास्तर ?
नीलेश कराळे यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय,त्यात त्यांनी राज ठाकरे यांना देखील मेंशन केलंय.तसेच त्यांनी मशिदिवरील भोंग्यावरून केल्या जाणाऱ्या राजकारणावर भाष्य केलंय.कराळे मास्तर या व्हीडिओत म्हणतात, “तुम्ही भोंग्यात हनुमान चालीसा वाजवा,कुणी भोंग्यात अजान वाजवा,आम्ही भोंग्यात राष्ट्रगीत वाजवू”
या विधानानंतर समोर बसलेले तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एकच जल्लोष करताना टाळ्या वाजवताना दिसतात.
यावरून आजच्या तरुणाना आता धार्मिक मुद्याच्या राजकारणाचा अजेंडा लक्षात आला आहे असे म्हणता येईल.
ही देशासाठी एक आश्वासक बाब म्हणायला हवी.
धार्मिक मुद्यावरून राजकारण करणाऱ्या पक्षांना तरुण साथ देत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
आता राज ठाकरे या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
मशीद भोंगा प्रकरण : सुजात आंबेडकर याना मनसे चं प्रत्युत्तर
अमित ठाकरे याना हनुमान चालीसा म्हणायला सांगा – सुजात आंबेडकर
आर्यन खान:समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
Bank frauds in india मागील सात वर्षात सर्वात मोठा घोटाळा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 11, 2022 09:07 AM
WebTitle – Nilesh Karale reply to Raj Thackeray on masjid loudspeaker