महाड/इंदोर: भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, देशातील अस्पृश्य आणि वंचित घटकांना सार्वजनिक नदी तलाव आणि इतर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना स्पर्श करून पाणी पिण्याचा आणि वापरण्याचा अधिकार नव्हता. ही विषमता आणि भेदभाव दूर करण्यासाठी आणि वंचित वर्गाला हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे असलेल्या सार्वजनिक चवदार तालावर आपल्या अनुयायांसह सत्याग्रह केला.यानिमित्ताने 95 लिटर सरबत वाटप करण्यात आले.
ही सत्याग्रह चळवळ महाड सत्याग्रह म्हणून ओळखली जाते.
त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ‘महाड सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता तर मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी होता’.
महाड सत्याग्रहाला 95 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरातील डॉ.आंबेडकर युवा समितीने
ए. बी. रोड चौकात असलेल्या डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी ९५ लिटर सरबत वाटप करून महाड सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला.
चवदार तळे येथे भेट देणाऱ्या विविध लोकांना थंड सरबत पिऊन उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला,
तर काहींना महाड सत्याग्रहाची माहितीही प्रबोधनात्मक चर्चेतून देण्यात आली.
सदर सरबत वाटप हे मध्यप्रदेश इंदोर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा समिती यांच्यातर्फे करण्यात आले होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा समिती चे विविध पदाधिकारी उपस्थित होते.मुरलीधर राहुल माटंगे, भीमराव सरदार, रघुवीर मरमट, भरत निंबाडकर, महेश जाटव, सुमित गुरुचाळ, जितेंद्र मालवीय, पांडुरंग सुरवाडे, राहुल निहोरे, रवींद्र गुरुचाळ, रणजित गोहर आदींसह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली..
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 21, 2022 17 : 40 PM
WebTitle – Distribution of 95 liters of syrup on the occasion of Chavdar Tale Mahad Satyagraha Day