जम्मू-काश्मीरवर बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सतत चर्चेत आहे. भारतीय जनता पक्ष ( BJP ) शासित राज्यांमध्ये या चित्रपटाला मोठा पाठिंबा मिळत आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी काँग्रेस चे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी बुधवारी विधानसभेतील सर्व आमदारांना ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रित केले. ते म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केंद्रीय जीएसटी कर हटवला तर देशभरात चित्रपट करमुक्त होईल.दरम्यान,या चित्रपटाच्या संदर्भाने वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत असून भाजप यातून राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.तर दुसरीकडे इतर दिग्दर्शक सुद्धा याकडे कसे बघतात यावर चर्चा सुरु झालीय,या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी काश्मीर फाईल्स संदर्भात बातचीत केल्यावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी काँग्रेस च्या मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण
खरं तर, छत्तीसगड विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक यांनी ‘काश्मीर फाइल्स’चा मुद्दा उपस्थित केला. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या काश्मीरमधून पलायनावर आधारित या चित्रपटाला छत्तीसगडमध्ये करातून सूट देण्यात यावी, असे ते म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना सांगितले की, चला चित्रपट पाहायला जाऊ या. भारत सरकारलाही कराचा काही भाग मिळतो, त्यामुळे केंद्राने संपूर्ण देशात ‘काश्मीर फाइल्स’ करमुक्त करावी.
काश्मीर फाइल्स : नागराज मंजुळे काय म्हणाले ?
काश्मीर फाईल्स संदर्भात नागराज मंजुळे याना प्रश्न विचारला गेल्यावर जे म्हणाले की,चित्रपटावरून वाद होणे चुकीचं आहे.मी फक्त झुंडच बघणार ते ही चुकीचं आहे. तुम्ही झुंड बघा, पावनखिंड बघा, काश्मीर फाईल्स बघा किंवा अजून जगात काही असेल तर तेही बघा. किंवा काहीच बघू नका. हे जे चाललंय ते कोंबड्याच्या झुंजी लावून दिल्यासारखं आहे, ज्याला काही अर्थ नाही.
यावेळी नागराज असेही म्हणाले की माझ्या प्रेमापोटी जरी कुणी ऍग्रेसिव्ह होत असेल तर तेही चुकीचं आहे.ते मला आवडणार नाही. कलाकृतीला कलाकृती म्हणून पाहा. आम्ही फिल्म बनवणारे दिग्दर्शक, निर्माते घरी आणि तुम्ही थिएटरबाहेर हाणामाऱ्या करणार, हे चुकीचं आहे.
हा सिनेमा आहे, तो बघा, विचार करायचा असेल तर करा, तुम्हाला पटलं तर ठीक.
कलाकृती म्हणून पहा, त्यातून काहीशी अक्कल आली तर तुम्हालाच फायदा होईल.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 18, 2022 17: 00 PM
WebTitle – Kashmir Files: A clear opinion of Nagraj Manjule