Monginis हा बेकरी उत्पादन क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड मानला जातो.आपली उत्पादने विकण्यासाठी विविध कंपन्या आपल्या मालाची जाहिरात करत असतात.लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कल्पक पद्धतीने जाहिरात करण्याकडे कंपन्यांचा कल असतो,मात्र अलिकडे काहीतरी वादग्रस्त केल्यास लवकर प्रसिद्धी मिळते,जाहिरातीत पैसे खर्च करणे आणि लोकप्रिय होण्यासाठी वाट बघणे या वेळखाऊ प्रकाराला बाजूला करून काही कंपन्या अशा स्वस्त मार्गाचा अवलंब करताना दिसून येतात,अशाच प्रकारचा प्रयत्न Monginis controversial ad निर्मिती करून केल्याचे दिसते.मात्र यामुळे लोक संताप व्यक्त करू लागले आहेत.१४ फेब्रुवारी ही तारीख लक्षात घेऊन ही जाहिरात जाणिवपुर्वक करण्यात आलीय.असे काही लोकांचे म्हणणे आहे.
काय आहे मोंजीनिस ब्रँड?
मोंजीनिस हे नाव आता अनेकांना माहित झाले असेलच.वाढदिवस असेल तर केक कुठून आणायचा असा प्रश्न पडतो तेव्हा साहजिकच पहिलं नाव मोंजीनिस केक हेच समोर येतं,अर्थात आता या नावाला रिप्लेस करणारे अनेक ब्रँड बाजारात उपलब्ध झाले आहेत,त्यामुळे मोंजीनिस कंपनीला तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे.मोंजीनिस ही एक बहुराष्ट्रीय पेस्ट्री आणि बेकरी साखळी उत्पादन बनवणारी भारतीय कंपनी असून तिचे भारत आणि इजिप्तमधील विविध शहरांमध्ये आउटलेट्स असून मुंबईत मुख्य कार्यालय आहे. 2019 मध्ये, ब्रँड विश्लेषक कंपनी, ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायझरी द्वारे आयोजित केलेल्या ब्रँड ट्रस्ट अहवाल 2019 नुसार, मोंजीनिस भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये 648 व्या क्रमांकावर होती.
मोंजीनिस कंपनीचा फाउंडर मालक कोण?
20 व्या शतकाच्या सुरुवातीला, दोन इटालियन बांधवांनी मुंबईच्या फोर्ट परिसरात एक कॅटरिंग सेवा सुरु केली, जी शहरातील काही युरोपियन रहिवाशांमध्ये लोकप्रिय झाली.1958 मध्ये, मोंजीनिस केटरिंगचा ताबा खोराकीवाला कुटुंबाने घेतला आणि मोंजीनिस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड बनले. 1971 मध्ये, कंपनीने व्यवसायाचे फ्रेंचायझी मॉडेल तयार करून कंपनीचा विस्तार केला. ज्यामध्ये स्थानिक अभिरुचीनुसार स्थानिक उत्पादनावर जोर देण्यात आला. गुणवत्ता, सादरीकरण आणि सेवेवर लक्ष केंद्रित करून त्यांनी स्वतःला “फूड बुटीक” संकल्पनेवर आधारित एक मॉडेल म्हणून उभे केले. 2012 पर्यंत एकूण 950 दशलक्ष रुपये बाजारमूल्यासह ब्रँड देशभर पोहोचला आहे.
Monginis controversial ad मोंजीनिस च्या जाहिरातीत वादग्रस्त काय?
मोंजीनिस केक च्या जाहिरातीत दोन कुत्र्यांचा वापर केला असून यातील मादी असणाऱ्या कुत्रीला फुलनदेवी हे नाव देण्यात आलंय.आणि यामुळे अनेकांना संताप आला.ही जाहिरात आज सकाळीच युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आली आहे,आणि यानंतर काही वेळातच तिच्याबद्दल लोकांनी आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केलीय.
कोण आहेत फुलनदेवी ?
उत्तरप्रदेशाच्या कानपूर मधील बहमाही गावात तथाकथित उच्चजातीय समाजातील नराधम विकृत मर्दांनी
आपली मर्दुमकी गाजविण्यासाठी एका १५ वर्षाच्या मुलीला घरात कोंडून तीन आठवडे तिच्यावर सतत सामुहिक बलात्कार केला.
गावातील काही दलित लोकांनी तिची यातून कशीबशी सुटका केली.
त्या मुलीने काय करावं? वयात येण्याअगोदरच तिचं आयुष्य उध्वस्थ झालेलं.
एक अजान कळी उमलण्याआधीच जातीयवादी मर्दांच्या वासनेची शिकार झाली.आता उरलेलं आयुष्य ती कसे घालवणार? समाज तिच्या घरचे तीला स्वीकारतील? पोलिसात कोर्टात गेल्यावर तिला खरोखर न्याय मिळाला असता? केस तरी दाखल करून घेतली असती?
एवढे आभाळफाटूनही ती खचली नाही.त्या मुलीने हार मानली नाही.तीने आत्महत्या केली नाही.
ज्यांनी तिला लुटली त्यांना धडा शिकवण्याची तीने शपथ घेतली.डोक्याला कफन बांधलं काही लोक जमवले.
तिने आदेश दिला त्यांचा वध झाला.
१४ फेब्रुवारी १९८१ म्हणजे आजच्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ती त्याच बहमाही गावात दाखल झाली.
ज्यांनी ज्यांनी बलात्कार केला त्या बुळग्या मर्दाना निवडून एका ओळीत उभे केले.
बलात्कार करताना हिंस्त्र पशुप्रमाणे तिच्या शरीराचे लचके तोडणारे लांडगे आज तिच्यासमोर मृत्युच्या भयाने थरथर कापत होते.
तिने आदेश दिला त्यांचा वध झाला.आत्मसन्मानाचा बदला घेतला.
त्या रणरागिनीचे नाव फुलनदेवी !!
साहजिकच फुलनदेवी या आजच्या मुली आणि स्त्रियांसाठी एक प्रेरणा आहेत ऊर्जादायी व्यक्तिमत्व आहेत.
जाहिरातीत जाणीवपूर्वक नाव देण्यात आलं का?
याबाबत आम्ही सामाजिक कार्यकर्ते नितीन दिवेकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी म्हटलं की जाहिरातीचं टायमिंग आणि १४ फेब्रुवारी या दिवशी फुलनदेवी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा घेतलेला बदला,यात नेमकं साम्य आहे.आणि कदाचित यामुळेच याच्याशी संबंधित मानसिकता असणाऱ्या विकृत बुद्धीतून ही जाहिरात जन्माला आली आहे.त्यामुळे जाहिरात निर्माण करणाऱ्या व्यक्तीने कुत्रीला फुलनदेवी हे नाव देऊन आपली विकृत मानसिकता शमविण्याची संधी शोधली आहे.यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे,कंपनीने सुद्धा अशा स्वस्त मार्गाने ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान न करता आपला व्यवसाय करायला हवा अशी अपेक्षा नितीन दिवेकर यांनी व्यक्त केलीय.
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 08, 2022 12: 00 PM
WebTitle – Monginis controversial ad Anger over naming dog Phoolan Devi