चेन्नई : धर्म बदलला तरी जात बदलत नाही,एका धर्मातून दुसर्या धर्मात धर्मांतर केल्याने व्यक्तीची जात बदलणार नाही, असा निकाल (Madras High Court) मद्रास उच्च न्यायालयाने दिला असून, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या मागासवर्गीय व्यक्तीने आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेली याचिका रद्दबातल ठरवली आहे.कायद्यानुसार दलित-धर्मांतरितांना मागास समुदाय (BC) सदस्य मानले जाते, अनुसूचित जाती म्हणून नाही.शासनाच्या या जातीसाठी असणाऱ्या सवलती आणि सरकारी नोकरीतील प्राधान्य मिळविण्यासाठी या व्यक्तीने न्यायालयाला आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळावे यासाठी विनंती केली होती.
पी. सर्वानन ही व्यक्ती आदि-द्रविड जातीची आहे. या जातीचा समावेश चेन्नई मध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे.पी. सर्वानन यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यामुळे त्यांना मागास जातीचे (बॅकवर्ड कास्ट BC) असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. पी. सर्वानन यांनी जी. अतीयानीती या हिंदू-दलित – अरूनथथीयार या जातीतील मुलीशी लग्न केले. या जातीचा समावेशही अनुसूचित जातीमध्ये होतो व जी. अतीयानीती कडे तसे प्रमाणपत्र आहे.
पती-पत्नी दोघेही अनुसूचित जातीचे
या दोघांनी लग्न केल्यानंतर आपणास आंतरजातीय विवाहित असे प्रमाणपत्र मिळावे म्हणून तहसीलदारांकडे अर्ज केला होता,कागदपत्रांची छानणी केल्यानंतर तहसीलदारांनी हा अर्ज अमान्य केला. त्यानंतर पी. सर्वानन यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना आंतरजातीय विवाहित असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.
यामागे उद्देश हा की, त्यांना आंतरजातीय विवाहितांना मिळणाऱ्या शासकीय सवलती मिळाव्यात. यात नोकरीत प्राधान्यही मिळते.
उच्च न्यायालयात त्यांच्याकडे मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र आहे व पत्नीकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे
म्हणून हा विवाह आंतरजातीय असल्याचा त्यांचा दावा होता. उच्च न्यायालयाने म्हटलं की ते जन्माने अनुसूचित जातीचे आहेत.
मात्र त्यांनी धर्मांतरण केल्याने त्यांची जात बदलत नाही. पती-पत्नी दोघेही अनुसूचित जातीचे आहेत.
त्यामुळे त्यांचा विवाह आंतरजातीय ठरत नाही असे स्पष्ट करत ही याचिका फेटाळली.
धर्म बदलला तरी जात बदलत नाही
जन्मत: असलेली जात एका धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार केल्याने बदलत नाही. धर्म परिवर्तनामुळे मूळ जातीचे अनुसूचित जाती, जमाती, अति मागासवर्गीय, मागासवर्गीय इत्यादी वर्गीकरण बदलत नाही. – न्या. एस. एम. सुब्रमण्यम, मद्रास उच्च न्यायालय
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 27, 2021 19:12 PM
WebTitle – Religion will change but caste does not change Madras High Court verdict