आताच एक आगळावेगळा चित्रपट प्रदर्शित झाला नाव आहे ‘जय भीम’. चित्रपटाचे नाव पाहता बऱ्याच लोकांचा असा समज होता की चित्रपट हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असावा किंवा बहुजनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्यांनी ‘खऱ्या अर्थाने’ स्वीकार केला अश्या बौद्ध समाजावर चित्रित असावा.पण चित्रपट पाहिल्यावर बऱ्याच जणांना वाटले असेल की चित्रपटाचे नाव ‘जय भीम’ का? परंतु ज्यांनी हा चित्रपट अभ्यासाच्या दृष्टीने पहिला त्यांना चित्रपटाच्या सुरुवातीलाच याचे उत्तर सापडले असेल..जय भीम चित्रपट हा मानव हक्कांसाठी लढणारे वकील ॲड. चंद्रू यांनी लढलेल्या आणि जिंकलेल्या एका किचकट अश्या खटल्याच्या सत्य घटनेवर आधारीत आहे.
आदिवासी बांधवांकडे जागेचा ७/१२ देखिल नाही
या भूमीचे मूलनिवासी असणाऱ्या आदिवासी जमातीवर बऱ्याचदा अत्याचार झाले आहेत आणि काही प्रमाणात बरेच अत्याचार आजही होत असताना वर्तमानपत्रांच्या कुठेतरी कोपऱ्यात असलेल्या बातमी मध्ये आढळून येते. दूर कुठे जंगलात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांवर झालेला अत्याचार आजही वर्तमानपत्रातल्या बातमीने आमच्या सकाळच्या चहाचा गोडवा कमी करतो.
आज जेव्हा देशात स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदे दाखवावी लागत आहेत तिथे माझ्या या आदिवासी बांधव ज्यांच्याकडे साधा जागेचा ७/१२ नाही अश्यांपुढे बाकीचे कागद सादर करणे हे मोठे आव्हानच आहे. जो आदिवासी वर्षानुवर्षे त्या जंगलात राहत आहे त्याला आजही बऱ्याचदा स्वतः ला आदिवासी सिद्ध न करता येत असल्याने बऱ्याच योजनांपासून वंचित राहावे लागते.
आजही असे का याचे कारण जय भीम चित्रपटात पाहायला मिळते जेव्हा जातीचा दाखला बनवण्यासाठी गेलेल्या काही आदिवासी बांधवांना हे विचारले जाते की दाखला घेऊन , शिकून काय करणार, काय मिळणार शिकून???? मग हा प्रश्न त्या आदिवासी बांधवांना छळतो आणि ते पण हाच विचार करतात. पण याच प्रश्नाचे उत्तर शिक्षणाचे महत्त्व माहित असलेल्या चित्रपटातल्या शिक्षिकेनं सोप्या भाषेत सांगितला आहे.
न केलेल्या अपराधाच्या शिक्षेच्या विरुद्ध संघर्ष
ती म्हणते, “पहिले शिका, मग सगळे काही मिळेल”.
आणि अगदी याच बाबीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज परिवर्तनासाठी सगळ्यात महत्वाचे मानले आहे.
आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात “शिका”.
या चित्रपटामधील नायक सूर्या यांनी ॲड. चंद्रू ही भूमिका साकारताना ‘संघटित व्हा’
या बाबासाहेबांच्या दुसऱ्या महत्त्वाच्या संदेशाला उजाळा दिला आहे.
चित्रपटामध्ये नायकाची म्हणजेच सूर्या ची एन्ट्री वकिलांच्या संघटनाचे नेतृत्व करीत नारेबाजी करताना झाली आहे.
अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी संघटन हे खूप महत्त्वाचे आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ‘संघटित व्हा’…..
जय भीम हा संपूर्ण चित्रपट एका आदिवासी महिला (सेंगिनी) च्या आपल्या पतीला (राजकुन्नू) च्या शोधासाठी
व त्याने न केलेल्या अपराधाची त्याला मिळालेल्या शिक्षेच्या विरुद्ध संघर्षावर आधारित एक सत्य घटना आहे.
‘शिका, संघर्ष करा,संघटीत व्हा’
हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला त्याने प्रेरित होवून
ॲड. चंद्रू यांनी आपले आयुष्य मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी लढण्यात घालवले.
आणि असाच एक संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला असून डॉ. बाबसाहेब यांच्या ‘संघर्ष करा’
हा आणखी महत्त्वाचा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे. एकंदरीत ‘शिका, संघर्ष करा,संघटीत व्हा ‘
या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वाच्या संदेशाची अंमलबावणी होताना या चित्रपटात दिसून येते.
डॉ. बाबसाहेब जरी अखंड मानव जातीसाठी लढले असले तरी
त्यांना एका विशिष्ट जातीमध्ये कसे मर्यादित ठेवले जाते हे नेहमीच आपल्याला दिसून येते.
अजून देखील डॉ. बाबासाहेब यांचे या देशासाठी योगदान म्हणजे
‘घटनाकार’ या एका शब्दावर सीमित ठेवण्याचे खोडसळ प्रकार नेहमी आढळतात.
बाबासाहेब लोकांपर्यंत पोहचू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न घेताना काही लोक दिसतात.
ॲड.चंद्रू यांची प्रेरणा
अगदी शाळेतल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत देखील बऱ्याचदा लहान मुलांना त्यांच्या टीचर आपल्याला इंग्रजांकडून स्वातंत्र मिळवून देणाऱ्या स्वातंत्र सैनानिंचा पोशाख घालून उभे करतात. पण वर्षानोवर्षे अघोषित गुलामगिरीतून स्वातंत्र मिळवून देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मात्र याच टीचर ना विसर पडतो. जय भीम चित्रपटात देखील हे वास्तव्य मांडण्यात आले आहे.
चित्रपटात ॲड. चंद्रू यांच्या खोलीत कार्ल मार्क्स, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार ई.व्ही. रामसामी यांच्या आकृत्या दिसून येतात, तर जगाला शांततेचा महान संदेश देणारे करुणामय भगवान बुद्ध यांची ज्ञानसाधनेची प्रतिमा देखील पाहायला मिळते. बुद्धांच्या याच प्रतीमेकडून कदाचित एक रुपया न घेता मानव हक्कांचे खटले लढण्यासाठी,पहिली त्या मानवाच्या प्रती जी करुणा निर्माण व्हावी लागते ती करूणा निर्माण होण्याची ॲड. चंद्रू यांना प्रेरणा मिळत असावी.
खटल्याचा टर्निंग पॉइंट
शिक्षणाच्या अभावामुळे मानवी जीवनात बऱ्याच अडचणी येतात. त्यामधील मुख्य बाब म्हणजे अशिक्षित वर्गावर बऱ्याचदा होणारे अत्याचार.
जय भीम चित्रपटात राजकुन्नू याची चूक हीच होती की तो आदिवासी म्हणून जन्माला आला.
त्यात भर पडली ती त्याच्या अशिक्षितपणाची. म्हणून तर त्याने न केलेल्या गुन्ह्याची (चोरीची) शिक्षा म्हणून त्याचा तुरुंगात खूप छळ झाला.
बऱ्याचदा गुन्हेगारांनकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना वेगवेगळे मार्ग वापरावे लागतात.
पण चित्रपटात दाखवण्यात आलेल्या custodial torture चा काही प्रमाणत अतिरेक बऱ्याचदा दिसून येतो.
देशात पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात पण त्याचीच दूसरी बाजू या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Haebus Corpus सारख्या writ चा वापर करीत कसलेच धागे दोरे हातात नसताना
याचिका न्यायाधीशांनपुढे मांडण्यात जे ॲड. चंद्रू यांना यश मिळाले त्यासाठी त्यांच्या masterstrock ला सलाम….
न्यायाधीशांनी याचिका स्वीकारणे हा त्या खटल्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
संवेदनशीलता अत्यंत महत्वाची
Haebus Corpus सारख्या याचिकेवर आधारीत खटले न्यायालयात सर्रास खारीज होताना दिसतात तिथे सदर खटल्यामध्ये ॲड. चंद्रू यांनी तो खटला यशस्वी रित्या सादर करीत त्या आदिवासी महिलेला न्याय मिळवून देत त्या आदिवासी सेंगीनी चा न्यायव्यवस्थेवर विश्वास बसवण्याचे काम केले. या देशात सर्वसाधरण माणसाकडे त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरद्ध लढण्यासाठी खूप शक्तिशाली हत्यार आहे आणि ते म्हणजे ‘ कायदा’… म्हणून ॲड. चंद्रू म्हणतात “Law is a very powerful weapon, what matters is how you use it to save the lives”….
जगात जर परिवर्तन घडवायचे असेल तर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये अतिमहत्वाची म्हणजे संवेदनशीलता.माणूस जर संवेदनशील असेल तरच त्याला समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींसाठी कळकळ असू शकते आणि त्या कळकळीमुळे बऱ्याचदा बदल घडतो.या चित्रपटात अशीच संवेदनशीलता ॲड.चंद्रू यांच्याकडे दिसून येते.मी समाजाचा भाग आहे आणि समाजात कोणावरही अन्याय होवू नये ही अगदी मापक इच्छा बाळगणे एखाद्या संवेदनशील व्यक्तीकडूनच अपेक्षित आहे.
बाबासाहेबांना फक्त एका जातीमध्ये ठेवण्याचे षडयंत्र
जय भीम चित्रपटामध्ये राजकुन्नू व्यवस्थेशी दोन हात करत करत मरून गेला पण परिस्थितीमुळे हतबल असलेली त्याची गरोदर बायको ( सेंगिनी) ला लढण्याची ताकद ही मिळाली ती ॲड. चंद्रू यांच्यासारख्या सत्यासाठी लढणाऱ्या योध्यामुळेच… एकंदरीत चित्रपटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी नसले तरी त्यांच्या विचारांनी व त्यांच्या लिखाणाने प्रेरित झालेले ॲड. चंद्रू जे आजदेखील डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजात रुजविण्याचे काम करत आहेत त्यांच्यारूपी डॉ. बाबासाहेबांचे परिवर्तनवादी विचारांची झलक नक्कीच पाहायला मिळते.
आज जिथे बाबासाहेबांना फक्त एका जातीमध्ये ठेवण्याचे षडयंत्र दिसून येते. शिवाय ज्यांचा असा समज आहे की डॉ. बाबासाहेब एका विशिष्ट जातीचेच उद्धरकर्ते आहेत त्यांना आवर्जून सांगावे वाटते की जय भीम चित्रपटात अन्याय झालेला राजाकन्ना हा आदिवासी जमातीच्या आहे. बाबासाहेबांना ज्या जातीपूर्ते मर्यादित ठेवले त्या जातीचा तो नसला तरी त्याला न्याय मिळाला आहे.
कायदा हा न जात पाहतो ना पंत. भारतीय राज्यघटनेच्या रुपी जी मौल्यवान भेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून आपल्याला मिळाली आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. संविधानाचा नीट अभ्यास केल्यावर नक्कीच तुम्ही बाबासाहेबांना एका विशिष्ट जातीपुर्ते मर्यादित ठेवणार नाही. आणि हो, सदर चित्रपटाचे नाव ‘जय भीम’ च का? हा प्रश्न तर तुम्हाला मुळीच पडणार नाही.
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 25, 2021 21:12 PM
WebTitle – Why Jai Bhim? On the occasion of Jay Bhim movie