इंदोर: रविवारी रवींद्र नाट्यगृह येथे बौद्ध समाजातर्फे चलो बुद्ध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये थायलंडहून आणलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात सम्राट अशोक, गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मुरलीधर राहुल मेटांगे लिखित आणि संपादित छोटे नाटक सादर करण्यात आले.देश विदेशात बौद्ध धर्माचा प्रचार आणि धम्माचे कार्य करत असल्याबद्दल आदरांजली म्हणून कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले चित्रपट आणि टीव्ही मालिका अभिनेते गगन मलिक यांना डॉ.आंबेडकर युवा समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र अर्पण करण्यात आले.यावेळी गगन मलिक म्हणाले की आपण सर्व मिळून धम्माचे कार्य करू. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर राहुल मेटांगे , भीमराव सरदार, रघुवीर मरमट, मोहन वाकोडे आदींसह समाज बांधव व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
गगन मलिक यांनी स्वीकारला बौद्ध धम्म
श्रीलंकेत निर्मिती झालेल्या तथागत भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित श्री सिद्धार्थ गौतम या चित्रपटात अभिनेता गगन मलिक यांनी तथागत बुद्धाची भूमिका साकारली होती.ज्यासाठी त्याना संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटादरम्यानच गगन मलिक यांच्यावर बौद्ध धम्म आणि गौतम बुद्ध यांच्या जीवनाचा प्रभाव पडला आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर देश-विदेशात गौतम बुद्धांच्या मूर्तींचे वाटप करून बौद्ध धर्माचा प्रचार सुरू केला.
मन की बात वर शेतकरी आंदोलनाचा,जन की बात चा विजय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत आहेत;खिडकीत कपडे वाळत घालू नका
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 23, 2021 22:15 PM
WebTitle – dr ambedkars picture gift to actor gagan malik