मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सार्वजनिक वक्तव्ये किंवा सोशल मीडिया पोस्ट करण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरता मनाई आदेश पारित करण्यास नकार दिला आहे.त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढच झाली आहे.
समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ
न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी असे म्हणता येणार नाही की मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.
“प्राइमा फेस स्टेजवर, असे म्हणता येणार नाही की आरोप पूर्णपणे खोटे आहेत”, असं न्यायमूर्ती माधव जामदार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढच झाली आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की ते मलिक यांच्या विरोधात मनाई हुकूम देऊ शकत नाही,
परंतु त्यांनी सुद्धा वानखेडे यांच्यावरील आरोपांची सार्वजनिक विधाने करण्यापूर्वी
त्यांची पडताळणी करण्यासाठी वाजवी काळजी घेतली पाहिजे.
गोपनीयतेचा अधिकार आणि भाषण स्वातंत्र्याचा समतोल राखला पाहिजे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
अधिकृत क्षमता असलेल्या व्यक्तीच्या कृतीबद्दल भाष्य करण्याचा अधिकार जनतेला आहे.
आर्यन खान प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मनाई आदेश नाकारला
न्यायालयाने आदेशात असेही निरीक्षण नोंदविले आहे की, नवाब मलिक यांची मीडियातील विधाने “दुर्भावाने आणि वैमनस्यातून घडली” असे दिसून येते, कारण या गोष्टी त्यांच्या जावयाला जामीन मंजूर झाल्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी दिसू लागल्या होत्या, ज्याला यापूर्वी ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आली होती. तथापि, प्रथमदर्शनी हे आरोप पूर्णपणे खोटे म्हणता येणार नाहीत असे सांगून मनाई आदेश नाकारला.
नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्या संदर्भात सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे.”पण आमदार असलेल्या व्यक्तीकडून पडताळणीची पातळी सर्वोच्च दर्जाची असली पाहिजे. तुमच्या स्वत:च्या प्रतिज्ञापत्रानुसार तुम्ही विधानसभेचे सदस्य आहात आणि राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात. तुम्ही अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे,” असेही न्यायमूर्ती जमादार यांनी मलिक यांच्या वकिलांना सांगितले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत आहेत;खिडकीत कपडे वाळत घालू नका
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 22, 2021 19:41 PM
WebTitle – Sameer Wankhede in trouble big comment of the court on the document