ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला जयभीम सिनेमा सुपरहिट ठरला,सोशल मिडियात त्याने अनेक दिवस चर्चा घडवून आणली.मात्र आता काही लोकाना त्यामध्ये वेगळे काही सापडायला लागले आहे. अभिनेता सूर्यासह ‘जय भीम’ चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीला ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आलीय.
‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे राज्याध्यक्षांनी जय भीम सिनेमा संबंधित लोकांना ही नोटीस बजावत चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ती काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसं न केल्यास ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केलाय. या संघटनेने चित्रपट निर्मात्यांवर त्यांच्या समाजाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमका आक्षेप काय?
‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे असे म्हणने आहे की
जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी होत आहे.
समाजाची बदनामी करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
त्यामुळे वेन्नीयार समाजाच्या संबंधीत सदर दृष्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावीत,
अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आलीय.
चित्रपटातील एका दृश्यात असणारे ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे.
त्यामुळे भावना दुखावल्याचा दावा करण्यात आला आहे.
चित्रपटातील पोलिस अधिकाऱ्याच्या नावलाही आक्षेप
“चित्रपटात पोलिस कोठडीत निरपराध व्यक्तीचा छळ करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव ‘गुरुमुर्ती’ असं दाखवलं गेलं आहे. तसेच त्याचा उल्लेख करताना तो “गुरू” असा करण्यात आलाय. गुरू हे वेन्नीयार समाजातील एका मोठ्या नेत्याचं नाव आहे. याशिवाय पीडिताच्या मृत्यूची तारीख सिद्ध करताना या आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात दाखवलेल्या कॅलेंडरवर वेन्नीयार समुदायाचं प्रतिक दाखवण्यात आलंय,” तसेच मुळ घटनेत पोलिस निरीक्षक हा वेन्नीयार समाजाचा नव्हता त्यामुळे असे चुकीचे कृत्य वेन्नीयार समाजातील व्यक्ती करतेय असं यातून भासवलं गेलं आहे. असा दावा वेन्नीयार संगम संघटनेने केला आहे.
अभिनेता सूर्याची प्रतिक्रिया
PMK नेते अंबुमणी रामदास यांनी सुद्धा जयभीम सिनेमाचा अभिनेता सूर्याला पत्र पाठवून टीका केली तसेच काही प्रश्न विचारले त्यावर सूर्याने टीकेला उत्तर देताना म्हटले की “त्याचा आणि चित्रपटाच्या क्रूचा कोणत्याही समुदायाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. खरं तर, अशा काही घटना निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेचच चित्रपटात बदल करण्यात आले.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16, 2021 10:32 AM
WebTitle – Notice of Rs 5 crore damages to ‘Jai Bhim’ filmmakers
Institutional Murder case of the resident Doctor Dr. Shruti Khobragade, occurred in KEM hospital Mumbai in October 2014,, the culprits prepared fabricated case papers for their protection.
Though the written complaint with proofs given to the Bhoiwada Police station and also sent to the Police Commissioner Mumbai, and even after various requests/reminders culprits police department not given the copy of FIR till today .
The police department diverted the point’s of the complaints by taking bribes from the culprits.
Since last 7 years various lots of complaints and reminders sent to the government missionaries , but the manuwadi of the government missionaries not taken action in the matter.
Complaints are also sents to the highest authorities including , ” The President of India”
In spite of various complaints the people’s occupying the key positions are also suppressing the entire matter. It is felt that the currupt authorities are also collecting the bribes from the culprits as well as from the suppressors for protecting them.
The highest authorities are not taking actions on their subordinates who suppressed the entire matter.
It is requested to the “Film Producer” to take this issue also for redressal. and gaining the justice.
B.S.Khobragade 9423207072
Retired Administrative Officer
(Father of Dr.Shruti )
19. November 2021