नांदेड : मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त करण्याची कारवाई केली आहे.तसेच यामध्ये २ जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.या कारवाई संदर्भातील माहिती विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.दुसरीकडे, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात खंडणीच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या एनसीबीच्या एसआईटीने आतापर्यंत १२ हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत.
एसआयटीने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी अधिकाऱ्यांवर
लाचखोरीचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलने सुद्धा आपलं जबाब नुकताच नोंदवलेला आहे.
क्रांती ने केले ट्विट
नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त करण्याची कारवाई झाल्याची बातमी आल्यानंतर क्रांती रेडकरने यावर प्रतिक्रिया दिली. क्रांती रेडकरने वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असं ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. याद्वारे क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असे बोलले जातेय.
हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता अशी माहिती मिळत आहे.ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला नेला जात होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. एनसीबीने या प्रकरणी ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे.
दुसऱ्या घटनेत, गुजरात एटीएसने मोरबी पोलिसांसह संयुक्त कारवाईत झिंजुडा गावात रविवारी रात्री उशिरा छाप्यात 600 कोर किमतीचे 120 किलो ड्रग्ज जप्त केले. हे मोरबी पासून 35 किमी अंतरावर समुद्रकिनारी असलेले गाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. गुजरातमध्ये कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्याची ही आठवडाभरातील दुसरी वेळ आहे.
गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव, एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15, 2021 17:10 PM
WebTitle – NCB seizes 1127 kg of cannabis in Nanded