लखनौः २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये (BABA RAGHAV DAS MEDICAL COLLEGE, GORAKHPUR) ऑक्सिजनच्या अभावी ६३ अर्भकांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मूळ दोषींवर कारवाई करण्याऐवजी (Dr Kafeel khan ) डॉ.कफील खान यांना आरोपी करण्यात आले होते.त्यांना बुधवारी उ. प्रदेश सरकारने अखेर सेवेतून बडतर्फ केले आहे. त्या संदर्भातील आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना डॉ. कफील खान यांनी आपली लढाई, संघर्ष पुढे चालूच राहील असे म्हटले आहे.
फेसबुक व्हिडिओ द्वारे त्यांनी आपले म्हणने मांडले
सरकारने 2 ऑक्सीजन पुरवठादारांना पैसे न दिल्याने 63 मुलांचा मृत्यू झाला.8 डॉक्टर,कर्मचारी निलंबित करण्यात आले.
7 पुन्हा रुजू करून घेण्यात आले.
वैद्यकीय निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अनेक तपास आणि न्यायालयाने क्लीन चिट देऊनही –
मला (डॉ.कफील खान) सेवेतून बडतर्फ केले गेले आहे.
आई-वडील न्यायासाठी भटकतात
न्याय? अन्याय? तुम्हीच ठरवा
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.मी संघर्ष करत राहणार
अशा शब्दात त्यांनी आपले ,म्हणने मांडले.
चौकशी अहवालात निर्दोष
या वर्षाच्या सुरुवातीला, राज्य सरकारने 24 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेला विभागीय चौकशीचा आदेश पुन्हा मागे घेतला होता. याप्रकरणी 15 एप्रिल 2019 रोजी तपास अधिकाऱ्यांनी दाखल केलेला तपास अहवाल सरकारने स्वीकारला होता. या अहवालात डॉ कफील खान निर्दोष असल्याचे आढळून आले. डॉ. कफील खान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार किंवा निष्काळजीपणाचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
लोकसेवा आयोगाने केली बरखास्तीची कारवाई
विभागीय चौकशीचा अहवाल लोकसेवा आयोगाकडे पाठवला होता. आयोगाने डॉ.कफील यांना बडतर्फ केले.
यासंदर्भात आयोगाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला पत्र पाठवून कफील यांना बडतर्फ केल्याची माहिती दिली.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 12, 2021 12:12 PM
WebTitle – Despite getting a clean chit Uttar Pradesh govt terminates Dr. Kafeel Khan from services