क्रूझ ड्रग्ज पार्टी वर धाड टाकून प्रसिद्धी झोतात आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, यांची अखेर वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे.लाचखोरी, खंडणी आणि ‘महागडी लॅविश लाईफ स्टाइल” अशा प्रश्नांसारख्या अनेक आरोपांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांना मुंबई ड्रग्ज बस्ट प्रकरणातील प्रमुख तपासअधिकारी म्हणून त्यांना तपास अधिकारी या भूमिकेतून वगळण्यात आल्याचे समजते.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार दिल्लीतील उच्च सूत्रांनी सांगितले की वानखेडे यांना चौकशीतून वगळण्यात आल्याचे आदेश आधीच जारी केले गेले आहेत आणि एनसीबी महासंचालकांनी इतर चार उच्च-प्रोफाइल प्रकरणे सुद्धा मुंबई झोनल युनिटकडून त्यांच्या केंद्रीय अँटी-ड्रग एजन्सीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
वानखेडे सध्या एजन्सीच्या मुंबई झोनल युनिटचे प्रमुख आहेत.
NCP नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कागदपत्रे खोटे,
धर्माबद्दल खोटे बोलणे आणि “बोगस” ड्रग्स प्रकरणात लोकांना अटक केल्याचा आरोप केल्याने
IRS अधिकारी राजकीय वादळाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.हे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळले आहेत.
समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया
समीर वानखेडे यांनी एएनआयला सांगितले की, ‘मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे दिल्ली एनसीबीची एसआयटी आर्यन आणि समीर खान प्रकरणाची चौकशी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा समन्वय आहे.
क्रांती रेडकरची यांची प्रतिक्रिया
क्रांती रेडकर यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास ट्विटरवरुन एनसीबीने ५ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केलेलं प्रसिद्धीपत्रक शेअर केलं आहे. “अफवांना बळी पडू नका. हे पाहा एनसीबीने जारी केलेलं अधिकृत पत्रक,” असं म्हणत या पत्रकाचा फोटो शेअर केलाय.
वानखेडे यांच्या विरोधात आता दलित संघटना; छाननी समितीकडे तक्रार
समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वत: अनुसूचित जातीतून असल्याचे सांगितले होते, असा दावा दलित संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. आरक्षण मिळवण्यासाठी समीरच्या वतीने बनावट कागदपत्रे दाखवण्यात आली. स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मी आणि भीम आर्मीने हे आरोप केले आहेत. त्यांच्या वतीने जिल्हा जात छाननी समितीकडे तक्रारही करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे दिल्लीतील एससी-एसटी आयोगाच्या कार्यालयात पोहोचले होते. तेथे त्यांनी त्यांचे जातीचे प्रमाणपत्र, पहिल्या पत्नीकडील मुलाचा जन्म दाखला आणि घटस्फोटाची कागदपत्रे दिली. सध्या आयोग त्या कागदपत्रांची तपासणी करत आहे, मात्र त्याआधीच समीर वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत.तुम्ही खरच बाबासाहेबांचे अनुयायी आहात,तुम्ही जयभीम वाले आहात तर तुम्ही एकतरी जयंतीमधला तुमचा फोटो किंवा बुद्ध विहारातला एक फोटो व्हिडिओ सोशल मिडियावरती टाका.असे आव्हान भीम आर्मीच्या अशोक कांबळे यांनी वानखेडे कुटुंबाला दिले आहे.
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 05, 2021 19:50 PM
WebTitle – Sameer Wankhede’s expulsion from Aryan Khan case established SIT