देशात भाषेवरून वाद होत आहेत.धर्मावरून वाद होत आहेत.जातीवरून वाद होत आहेत.देशात सतत अराजकसदृश परिस्थिती निर्माण केली जात आहे.कुणी कशा पद्धतीने जाहिरात द्यायची? काय खायचं? काय प्यायचं ? हे झुंडशाहीच्या बळावर ठरवलं जात आहे.एकीकडे धर्माचे गुणगान आणि दुसरीकडे त्याच धर्मातील इतर जातीच्या लोकाना जीव घेण्यापर्यंत प्राणघातक हल्ला.हे भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातील नसून 21 व्या शतकातील आधुनिक भारतातील सभ्य ? सुसंस्कृत? समाजातील ठळक चित्र आहे.गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम शहराजवळील गावात राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.कुटुंबातील सहा सदस्यांवर सुमारे 20 जणांनी हॉकीस्टिक रॉड आणि धारदार शस्त्रानी प्राणघातक चढवला, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
ही कथित घटना 26 ऑक्टोबर रोजी भचाऊ पोलीस ठाण्यांतर्गत नेर गावात घडली असली तरी
अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलीस उपअधीक्षक किशोरसिंह झाला यांनी सांगितले.
“या संदर्भात दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, एक गोविंद वाघेला आणि दुसरे त्यांचे वडील जगाभाई यांनी.या दोघांनी दावा केला की सुमारे 20 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. आम्ही दोषींना पकडण्यासाठी आठ टीम तयार केल्या आहेत,” श्री.झाला म्हणाले.
काना अहिर, राजेश महाराज, केसरा रबाई, पबा रबारी आणि काना कोळी यांच्यासह 20 जणांच्या जमावाविरुद्ध खुनाचा प्रयत्न,
दरोडा, प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जातीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एट्रोसिटी एक्ट (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राम मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते याचा राग आरोपींना होता
एफआयआरनुसार, गोविंद वाघेला आणि त्यांचे कुटुंब प्राणप्रतिष्ठा विधी सुरू असताना 20 ऑक्टोबर रोजी
नेर गावातील राम मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते याचा राग आरोपींना होता.
26 ऑक्टोबर रोजी श्री वाघेला त्यांच्या दुकानात होते,
तेव्हा त्यांना समजलं की काही लोकांनी त्यांच्या शेतात गुरे पाठवून त्यांचे उभे पीक हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.
एफआयआरनुसार, आरोपींनी मोबाईल फोन चोरला आणि तक्रारदाराच्या रिक्षाचेही नुकसान केले.
आरोपीने आई बधीबेन, वडील जगाभाई आणि इतर दोन नातेवाईकांवर हल्ला केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला असून,
सहा पीडितांवर भुज येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 29, 2021 22:36 PM
WebTitle – Dalit family attacked for visiting the Ram temple