अहमदनगर: जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कसारे गावच्या सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करत अमानवीय कृत्य करत चपलेचा हार घातल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्याच्या कसारे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. यात आरक्षण सोडतमध्ये सरपंचपद अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव होते.यात महेश अण्णासाहेब बोराडे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु सरपंच पद मिळल्यापासून त्यांना गावातील गांव गुंडांकडून जातीयवाद सुरू झाला.नवनिर्वाचित सरपंचाचा चपलांचा हार घालून अपमान करत जातीवाचक शिवीगाळ करत सरपंचांच्या मानवी हक्कांचे अवमूल्यन करण्यात आले.
नवनिर्वाचित सरपंच काही कामासाठी तालुक्याला जात असताना रस्त्यातच त्यांची गाडी थांबवून त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
तसेच सरपंचाचा चपलांचा हार घालून अपमान जातीवाचक शिवीगाळ करत सरपंचाचा असाच सत्कार झाला पाहिजे,
असं म्हटल्याचा आरोप सरपंच बोराडे यांनी केलाय.ही धक्कादायक घटना मंगळवार दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी
दुपारी १२:५० वाजता सरपंच महेश बोराडे हे आपल्या मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी निघाले होते.
त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि तिची लहान मुलगी होती.
शिंगोटे ते लोणी मार्गावरील जांभूळवाडी फाट्यावरून तळेगाव कडे जाताना,वडझरी येथे १:०० वाजेच्या आसपास आरोपी कृष्णाची सूर्यभान कार्ले आणि मच्छिंद्र हिरामण कार्ले यांनी बाईकवरून येवून रस्ता अडवला,बाईक आडवी घातली.आणि महेश बोराडे यांच्या गळ्यात अगोदरच सोबत आणलेली चपलांची माळ घातली.यावेळी महेश बोराडे यांच्या बहिणीने प्रतिकार केला असता जातीयवादी गांव गुंडांनी त्यांना दमदाटी करत ढकलून दिले.आणि महारांचा सत्कार आम्ही असाच करतो असे म्हणत त्यांना दमदाटी केली.तू सरपंच झालास म्हणून तुझा असा सत्कार केला आहे. जा काय केस करायची ती कर असे म्हणून तिथून निघून गेले.
महेश बोराडे यांनी पोलिस स्टेशनला गेले असता तिथे त्यांना ५ तास बसवून ठेवण्यात आलं. महेश बोराडे दुपारी गेलेले असताना त्यांना आरोपी येईपर्यंत बसवून ठेवण्यात आले. आरोपी आल्यानंतर त्यांना पोलिस स्टेशन मधून हुसकावून देण्यात आले. आणि अखेर सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली.
आरोपींनी केली दरोड्याची क्रॉस केस
जसं नेहमीच्या जातीयवादी अत्याचार गुन्ह्यात घडते तसेच इथेही पोलिसांच्या आशीर्वादाने घडले.
आरोपींनी पीडित लोकांच्या विरोधातच दरोड्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसानी ती लगेच नोंदवून घेतली.
पोलिसानी आरोपींवर गुन्हा दाखल केला असला तरी पीडितांवर देखिल गुन्हा दाखल करून
पीडित आणि त्यांचा भाऊ यांनाच अटक करण्यात आल्याचे समजते.
पीडितांनी न्यायाची मागणी केली आहे,मात्र त्यांना पुरोगामी महाराष्ट्रात न्याय मिळेल का?
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 27, 2021 22:00 PM
WebTitle – caste-based abused with kasara sarpanch by wearing a necklace of slippers atrocity in Ahmednagar