मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात दररोज नविन ट्विस्ट येत आहेत. अंमली पदार्थ विरोधी कारवाई करणाऱ्या एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) अनेक कारवाया बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. बॉलीवूडला बदनाम करून ही वसूली सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आज एनसीबीच्या एका अधिकाऱ्याचं पत्र सोशल मीडियात व्हायरल करून खळबळ उडवून दिली आहे.
‘समीर वानखेडे (Sameer Wankhede) हा एक नंबरचा बोगस माणूस आहे. ‘एनसीबी’च्या (NCB) माध्यमातून भाजपवाल्यांसाठी हजारो कोटींच्या वसुलीचा धंदा त्यांनी चालवला आहे. या सगळ्याचे पुरावे देऊन वानखेडेंची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही,’ असा इशारा नवाब मलिक यांनी यापूर्वीच दिला होता.आता एनसीबीच्या अधिकाऱ्याचं हे पत्र आल्याने मलिक आणखी ताकदीने टीका करत आहेत,मलिक यांनी हे पत्र एनसीबीच्या महासंचालकांना दिलं आहे. दिल्ली एनसीबीकडून सध्या वानखेडेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे. ती चौकशी करताना या पत्राचाही विचार व्हावा, अशी विनंती मलिक यांनी केली आहे.
बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली
वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली कशी झाली, याचा तपशील पत्रात आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास एनसीबीकडं सोपवण्यात आल्यानंतर
एनसीबीचे तत्कालीन संचालक राकेश अस्थाना यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सांगून
वानखेडे यांना विभागीय संचालक पदी नेमले होते.
बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम
समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना दिलं गेलं होतं.
गुन्हे दाखल होताच कोट्यवधी रुपये वसुली केली गेली.त्यातील वाटा राकेश अस्थाना यांनाही मिळाला होता.
दीपिका पादुकोन, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल यांच्याकडून पैसे घेतले गेले. अयाज खान नामक वकिलानं है पैसे गोळा केले. हा अयाज खान समीर वानखेडे यांच्या वतीनं बॉलिवूडमधून पैसे गोळा करतो. एनसीबी कार्यालयात त्याचा मुक्त वावर असतो. खंडणी गोळा करून देण्याच्या बदल्यात समीर वानखेडे अयाज खानला बॉलिवूड कलाकारांचं वकीलपत्र मिळवून देतो, असा आरोप मलिक यांनी पत्राच्या आधारे केला आहे.
टी-20 पाकिस्तानच्या विजयानंतर पाक फॅन ‘सैराट’, हवेत गोळीबार, 12 लोक जखमी
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 26, 2021 12 :20 PM
WebTitle – NCB officer sent a letter to Nawab Malik to expose sameer wankhede